यवतमाळ शहरात होणार झगमगाट; ६ कोटी ८८ लाखाचे पथदिवे मंजुर!

खासदार भावनाताई गवळी यांची माहीती; पिंपळगाव येथे कामाचा शुभारंभ
लोहारा बायपास ते धामणगाव बायपास पर्यंत मेट्रो सिटी प्रमाणे लावण्यात येणार पथदिवे
यवतमाळ : शहरातील लोहारा बायपास ते धामणगाव बायपास पर्यंत आंधाराचे साम्राज्य राहत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यामुळे या भागात पथदिवे लावण्याची मागणी अनेक नागरीकांनी खा. भावनाताई गवळी यांच्याकडे केली होती. खा. भावनाताई गवळी यांनी यासंदर्भात पाठपुरवठा करुन पथदिवे उभारणी करीता ६ कोटी ८८ लाख ३० हजार ८६६ रुपयाचा निधी नगरोत्थान महाभियान योजनेंतर्गत मंजुर करुन घेतला आहे. या पथदिवे कामाचा शुभारंभ खा. भावनाताई गवळी यांच्या हस्ते पिंपळगाव परिसरात झाला आहे. त्यामुळे आता नागपुर,पुणे, मुंबई मेट्रो सिटीच्या धर्तीवर यवतमाळ शहरातील लोहारा बायपास ते धामणगाव बायपास पर्यंत पथदिवे लावण्यात येणार असल्याने यवतमाळ शहरातील सौंदर्यात भर पडणार आहे.
रस्ते,इमारती,पुल व पथदिवे हे शहराच्या सौंदर्यात भर घालत असतात. मात्र, यवतमाळ शहरातील लोहारा बायपास ते धामणगाव बायपास पर्यंतच्या रस्त्यावर नेहमी आंधाराचे साम्राज्य राहत असे. त्यामुळे या मार्गावरुन रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करतांना अडचणीचे होते. म्हणून या रस्त्यावर पथदिवे लावण्याची मागणी विविध घटकांकडून वारंवार करण्यात येत होती.विशेषत: महिला वर्गाने देखील या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी खा. भावनाताई गवळी यांच्याकडे केली होती. म्हणून खा भावनाताई गवळी यांनी यवतमाळ शहरातील लोहारा बायपास ते धामणगाव बायपास पर्यंतच्या रस्त्यावर पथदिवे लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह विविध यंत्रणेकडे वारंवार पाठपुरवठा केला आहे. त्यामुळे नगरोत्थान महाअभियान अंतर्गत यवतमाळ शहरातील लोहारा बायपास ते धामणगाव बायपास पर्यंतच्या रस्त्यावर पथदिवे लावण्यासाठी ६ कोटी ८८ लाख ३० हजार ८६६ रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या पथदिवे कामाचा शुभारंभ खा. भावनाताई गवळी यांच्या हस्ते लोहारा बायपास ते धामणगाव बायपास वरील पिंपळगाव परिसरात झाला. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पउमाकांत पपिनवार, तालुका प्रमुख गुणवंत ठोकळ, सुरेश ढेकले, सुरेश कन्नाके, गणेश गावंडे, अड़ राजेश काले संजय कावलकर शिवसेना शहर प्रमुख पिंटू बांगर, नगरसेवक सुष्मा ताई राऊत , विकास शेळके, भूषण काटकर कंटेश तायडे प्रफुल कोडापे,आकाश जाधवर, संजय काळे शैलेश सराफ, टिंकू ढेंगाळे,बालू दराडे नितिन उमक श्री निकम , गौरव बावने, दीपक प्रधान, शुभम वाघाडे, ज्योतीताई चिखलकर सुष्मा ताई बरडे संगीता ताई पूरी तसेच नगर परिषदचे अभियंते वाजपीये व रामटेके साहेब उपस्थित होते . या पथदिव्यामुळे आता यवतमाळ शहरातील लोहारा बायपास ते धामणगाव बायपास झगमगाट होणार असून या भागात उच्च प्रतिचे पथदिवे लावण्यात येणार असल्याने यवतमाळ शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे.