कुसुमाग्रज काव्य श्री पुरस्कार 2024, गदिमा कथा गौरव पुरस्कार 2024, ना.सि. फडके ललित लेखन पुरस्कार 2024 करिता साहित्य पाठविण्याचे आवाहन
वसंताची लागणारी चाहूल, चैतन्यदायी होत जाणारा निसर्ग आणि बहरत जाणारं प्रेम याच अनुषंगाने आपल्या जीवनातील गोड अनुभव कथन करण्यासाठी सुविचार : संस्कार कलश व चैत्रांगण प्रकाशन, यवतमाळ च्या संयुक्त विद्यमाने *”हृदयी वसंत फुलतांना…”* या आशयावरील काव्य लेखन, कथा लेखन व ललित लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
काव्य स्पर्धेतील अतिउत्कृष्ट काव्यास कुसुमाग्रज काव्य श्री पुरस्कार 2024, कथा स्पर्धेतील अतिउत्कृष्ट कथेस गदिमा कथा गौरव पुरस्कार 2024, ललित लेखन साहित्यातील अतिउत्कृष्ट साहित्य कृतीस ना.सि. फडके ललित लेखन पुरस्कार 2024 देऊन गौरविले जाईल तर या सर्व स्पर्धेतील स्पर्धकांना स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. तर सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
तसेच सर्व साहित्य कृतींना प्रातिनिधिक काव्य संग्रह, कथा संग्रह व ललित लेख संग्रहामध्ये प्रकाशित केले जाईल.
तेव्हा आपण आपले साहित्य 9623298967 किंवा 7774985725 या व्हाट्सअप्प क्रमांकावर पाठवावे.
त्यानंतर आपल्याला एक गुगल फॉर्म दिला जाईल तो आपण आपली पूर्ण माहिती भरून पाठवायचा आहे. जस-जसे आपले साहित्य प्राप्त होत जाईल तस-तसे आपणास व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये ऍड केले जाईल. व वेळोवेळीच्या सूचना व निकाल कळविला जाईल.
साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
तेव्हा इच्छुक साहित्यिक मंडळींनी आपले साहित्य पाठविण्याबाबतचे आवाहन कार्यवाह प्रशांत ठेंगेकर यांनी केले आहे.