यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार का ?
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार का ?
यवतमाळ:- पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांनी विकास कामे केली नसल्याची ओरड नागरिकांमधून आहे, अशातच लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार असून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्यापही घोषित झालेला नाही, अशातच मतदारसंघ हा भावना गवळी यांच्यावर नाराज असल्याने अद्यापही महायुतीचा लोकसभेचा उमेदवार घोषित झाली नसल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे, अशातच शिंदे-फडणवीस सरकार नवीन चेहऱ्याला संधी देणार का?
हे पाहणं आता महत्त्वाचा ठरणार आहे अशातच मोदी लाटेत व रेल्वेच्या नावावर विद्यमान खासदार भावना गवळी यांना मतदारांनी निवडून दिले मात्र मतदारसंघात विशेष कामे खासदार गवळी यांनी केली नसल्याने जनमानसात कमलाची नाराजी आहे अशातच परत भावना गवळी यांना उमेदवारी दिली तर परत लोकसभा मतदारसंघात मोदी यांची लाट चालणार काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे