विश्व विजेता पत्रकार संघटनेची राळेगाव तालुका कार्यकारणी गठीत
अध्यक्षपदी खुशाल वानखेडे, जिल्हा उपाध्यक्षपदी संजय कारवटकर यांची फेरनिवड
राळेगाव/विश्वविजेता पत्रकार संघटनेची राळेगाव तालुका कार्यकारणी दिनांक २३/०३/२०२४ रोजी राळेगाव येथे झालेल्या बैठकीत विश्वविजेता पत्रकार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष रत्नपालजी डोफे यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष रत्नपालजी डोफे यांनी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी धानोरा येथील संजय कारवटकर तर राळेगाव तालुका अध्यक्षपदी खैरी येथील खुशाल वानखेडे यांची नियुक्ती करून राळेगाव तालुक्याची कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सम्यक म्हैसकर हे उपस्थित होते.
…. संस्थापक अध्यक्ष यांनी राळेगाव येथे झालेल्या बैठकीत खालील प्रमाणे कार्यकारणी गठीत केली. यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर राळेगाव तालुका अध्यक्ष पदी खुशाल वानखेडे , राळेगाव शहराध्यक्षपदी सागरभाऊ हिकरे, कार्याध्यक्ष उमेश कांबळे, सचिव शशीम कांबळे, तालुका उपाध्यक्ष गणेश हिवरकर व अमोल थुल ,प्रसिद्धी प्रमुख अरविंद कोडापे , कोषाध्यक्ष सुरज ढाले, तालुका संपर्कप्रमुख गोपीचंदजी ढाले, तालुका संघटक अक्षय विरुळकर , तसेच कार्यकारणीचे सदस्य शंकर पंधरे,अजय जुमनाके, असलम पठाण, प्रशांत भगत, तर राळेगाव शेतकरी विश्वविजेता तालुका अध्यक्ष नानाजी येनोरकर,व उपाध्यक्ष महादेव तुरणकर, तर सचिव पदी सुधाकर दांडेकर, यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व पदे तालुकाध्यक्ष खुशाल वानखेडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष रत्नपालजी डोफे यांच्या हस्ते खुशाल वानखेडे यांना प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. यावेळी विश्वविजेता पत्रकार संघटनेचे राष्ट्रीयउपाध्यक्ष सम्यक म्हैसकर व विश्वविजेता पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी हजर होते.
विश्वविजेता पत्रकार संघटना राळेगाव तालुका चे पुनर्नियुक्त झालेले नवानिर्वाचित अध्यक्ष खुशाल वानखेडे यांच्य नियुक्तीमुळे आनंदी वातावरण निर्माण झाले आहे तर नवनियुक्त अध्यक्ष यांनी सांगितले की मी संघाचा प्रोटोकॉल पाळुनच कामकाज करणार व वरिष्ठांना मान सन्मान देवून व सर्वाना सोबत घेऊन काम करणार तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचे सांगितले आहे