उमेदवारीसाठी आमदारांसह कार्यकर्ते मुंबईत ठाण मांडून
उमेदवारीसाठी आमदारांसह कार्यकर्ते मुंबईत ठाण मांडून विधानसभा निवडणुकीच्या घडामाेडींना वेग आला आहे. जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात भाजपचे आमदार आहे. मात्र, उमेदवारी मिळविण्यासाठी विद्यमान आमदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील पाच आमदार आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत ठाण मांडून आहेत. तर, पक्षातून नवीन चेहरा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पक्षश्रेष्ठी नवीन चेहरा देणार की, विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊन रिपीट करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.