गुरुजींनी फिल्टरचे पाणी पाजण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट.
गुरुजींनी फिल्टरचे पाणी पाजण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नाव लौकिक असणाऱ्या दहेगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता १ली ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्याकरिता शाळेमार्फत पिण्याचे शुद्ध पाणी म्हणून कुठलीही सोय शाळेमार्फत करण्यात आलेली नसून सदर विद्यार्थी हॆ शाळा परिसरात असणाऱ्या बोअरवेलच्या पाण्याने आपली तहान भागवित आहेत.
विद्यार्थी बोअरवेलचे अशुद्ध पाणी पित आहेत तर तेथे कार्यरत शिक्षक व इतर कर्मचारी स्वतःला पिण्यासाठी शाळे पासुन २०० मिटरवर असलेल्या परिसरातून फिल्टर चे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांकडूनच बॅरेलद्वारे शाळेत मागवितात.
विद्यार्थ्यांना पाणी अन्याकरीता गावातील मेन रोडने जात असलेल्या वाहना पासून जिव मुठीत घेऊन विद्यार्थी पाणी आणतात या वेळात जर काही अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण… आम्ही आमचे मुले शिक्षणासाठी शाळेत पाठवतो व शिक्षक त्यांना पाणी आणण्यासाठी पाठवता ही फार क्लेशदायक बाब असून याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांमधून तिव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
विशेष म्हणजे अनेक शाळेत हा प्रकार सुरू आहे विद्यार्थ्यांना सुगंधित तंबाखू व सिगारेट सुद्धा पानटपरी वरून आनन्यासाठी भाग पाडतात असी पालक वर्गात चर्चा सुरू आहे .सदर शाळेच्या मुख्याध्यापक यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कडक स्वरुपाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दहेगाव येथील नागरिकांमधून होतांना दिसून येत आहे.