आमदार बाेदकुरवार यांना उमेदवारी जाहीर हाेताच वणीत जल्लोष
आमदार बाेदकुरवार यांना उमेदवारी जाहीर हाेताच वणीत जल्लोष.
यवतमाळ : भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात भाजपचे वणी येथील विद्यमान आमदार संजीवरेड्डी बाेदकुरवार यांचा समावेश आहे. उमेदवारांच्या पहिल्या यादीत आमदार बाेदकुरवार यांचे नाव असल्याचे माहित पडताच वणीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. तसेच आमदार बाेदकुरवार यांना पेढा भरवून ताेंड गाेड केले.