जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे.
22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक विभागाने पूर्ण तयारी केली आहे. या ठिकाणी उमेदवारांना नामांकन अर्ज मिळेल. शिवाय मार्गदर्शन करण्यासाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. काही अडचण असल्यास कर्मचारी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी दिली.