शहरासह ग्रामीण भागातही मतदारांचा शरद मैंद वाढत पाठींबा.
निवडणुकीत विजयी झाल्यास पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही.
पुसद :- पुसद शहरी भागात महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंद यांना चांगला प्रतिसाद मिळत असताना आता ग्रामीण भागातील मतदारांकडूनही त्यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत होत आहे. महाराष्ट्राचा जाणता राजा शरद पवार यांनी विधानसभेत लढण्याची संधी दिली आहे. या निवडणुकीत विजयी झाल्यास पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंद यांनी दिली.
शरद मैद यांनी बेलोरा, मोहा, श्रीरामपूर, शेंबाळपिंपरी, मोहा, सेलू, काकडंदाती प्रचार दौरा पूर्ण केला. त्यानंतर गुरुवारी त्यांनी जांबबाजार जिल्हा परिषद सर्कलमधील वेलदरी, जनुना, नांदुरा (इजारा) सिगरवाडी, धानोरा, वडगाव, चिखली, पांडुर्णा (इजारा), रामपूर तांडा, पारवा (बु), ब्राह्मणगाव, भंडारी, राजना, उड़दी, हौसापूर, जमशेटपूर, जॉबबाजार येथे शेकडो कार्यकर्त्यांनी झंजावती प्रचार दौरा करण्यात आला. या प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंद यांच्यासोबत दिलीप बेद्रे, गणेश दिंडे, परमेश्वर जयस्वाल, साहेबराव ठेंगे, दीपक जाधव यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. या दौऱ्यात पुसद मतदारसंघाचा रखडलेला विकास साध्य करण्यासाठी साथ द्या, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करू, आजवर आपण एकाच परिवाराकडे सत्ता सोपविली. प्रस्थापिताने जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या नाहीत. आदिवासी गावाड्यात व गाव खेड्यात एसटी जात नाही. वीज येते आणि जाते वीज पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला साथ द्या, असे आवाहन केले. या प्रचार दौऱ्यात शरद मैंद नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गाव खेड्यातील नागरिकांन त्यांच्या समर्थनाचे स्वागत केले. गाव खेड्यातील अनेक प्रश्नांचा व समस्या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करु असे अभिवचन दिले. दरम्यान, शहरी भागातदेखील गृहभेटीवर शरद मैंद यांनी भर दिला असल्याने या भागाचा महाविकास आघाडीला वाढता पाठिंब दिसत आहे.