राळेगाव येथे ऑपरेशन सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा.
राळेगाव येथे ऑपरेशन सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा.
पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि युद्ध सुरू झाले. भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. सैनिकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी हिंमत देत तुमच्यामुळे आम्ही सुखाने झोपू शकतो, असा भाव व्यक्त करीत राळेगावकर हातात झेंडा घेऊन रस्त्यावर आले. शिवतीर्थ येथून निघालेल्या तिरंगा रॅलीत हातात झेंडा घेऊन हजारो राळेगावकर सहभागी झाले होते.
शूर सैनिकांना नमन करण्यासाठी व ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा गौरव करण्यासाठी सोमवार दि १९ रोजी तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सर्वात पुढे माजी सैनिक,आणि महिला-पुरुष सहभागी होते.
पाकिस्तान सदैव आतंकवाद्यांना प्रोत्साहन देत भारतावर हल्ले करतो. पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यामध्ये धर्म विचारून २६ निरपराध पर्यटकांची
पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी निर्घृण हत्या केली. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. देश भावना लक्षात घेता भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवायचे ठरवून आतंकवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हल्ले करून शेकडो आतंकवाद्यांना यमसदनी धाडले. त्यानंतरही शत्रू राष्ट्राने आगळीक करीत भारतावर अयशस्वी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे एअरबेस मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केले. परिणामी, पाकिस्तानला नांगी टाकावी लागली.
भारतीय सेनेच्या या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवतीर्थ येथून तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली.शहीद भगतसिंग चौक,क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौकमार्गे फिरत क्रांती चौकात या यात्रेचा समारोप करण्यात आला.
यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्रा,डॉ अशोक उईके,जिल्हाध्यक्ष अँड प्रफुलसिंह चौहान, तालुकाध्यक्ष छाया पिंपरे,चित्तरंजन कोल्हे,कुणाल भोयर,मनोज काळे,कैलास बोन्द्रे,प्रशांत तायडे,वंदना कुटे,संजय काकडे,अभिजित कदम,गणेश देशमुख,सतीश मानलवार,बबन भोंगारे,अनिल नंदूरकर,शारदानंद जैस्वाल,भूपतभाई कारिया,घनश्याम चांदे, यासह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते.
भारत मातेच्या रक्षणार्थ अहोरात्र आपले प्राण पणाला लावून लढणाऱ्या भारतीय सेनादलातील सैनिकांना या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली या यात्रेदरम्यान येथील माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला.यात राळेगावातील देशभक्त नागरिकांनी अतिशय उत्साहात भारतीय सैन्याच्या या कामगिरी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेत मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.