आदिवासी विकास मंत्री प्रा,डॉ अशोक उईके यांच्या हस्ते दहेगाव रस्त्याचे भूमिपूजन.
राळेगाव:- गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील दहेगाव रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता, या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता, ही बाब तेथील गावकऱ्यांनी वडकी वाढोना गणाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या प्रीती काकडे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांनी ही बाब आदिवासी विकास मंत्री तथा राळेगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रा डॉ अशोक उईके यांना सांगितली या मागणीला धरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत ७ कोटी रुपयांचा दहेगाव रस्ता त्वरित मंजूर करण्यात आला. त्यामुळे या रस्त्याचा भूमीपूजन सोहळा आज सोमवार दि १९ मे रोजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार अशोक उईके यांचा उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आला. ह्यावेळी भूमिपूजन समारंभाला सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे, गणेश देशमुख ,शेषराव ताजने, अभि जीवतोडे,बादल बदखल,अनिल नंदुरकर,शारदानंद जयस्वाल, श्रीकांत धनरे यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.