जिल्ह्यातील अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट धान्याचा पुरवठा.
जिल्ह्यातील अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट धान्याचा पुरवठा.
मनसेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना पोषण आहाराचे पाकीट.
मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
जिल्ह्यातील अंगणवाडीत पोषण आहाराला कुपोषणाचा तडका..अनिल हमदापुरे.
लहान मुलांना उलट्या, मळमळ व पोषण आहाराला दुर्गंधी, कडसरपणा च्या तक्रारी.
संबंधित कंत्राटदारावर कार्यवाहीच्या मागणी साठी मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन….
यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडीतील वय वर्ष सात महिने ते तीन वर्ष, तसेच गरोदर व स्तनदा माता यांना पाकीट बंद पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. यामध्ये शासनाच्या वतीने पाकीट बंद मूग डाळ तांदूळ पाकीट, तूर डाळ तांदूळ पाकीट, मल्टीग्रेन गोड पिठाचा शिरा या घटकांचा समावेश करण्यात येतो. परंतु दुर्दैवाने नगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यातील ग्रामीण भागात या आहाराविषयी अनेक तक्रारी मनसेला प्राप्त झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शासनाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या धान्यामध्ये एका विशिष्ट अशा प्रकारचा वास येत असून धान्याची चव पण कडसर आहे, तसेच हे अन्न शिजवताना खूप त्रास जात असून अनेक लहान मुलं सदर आहार खात नसून परिणामी पालकांना सदर आहार गुराढोरांना लावण्याची वेळ आली आहे.या विषयाची गंभीर दाखल घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पोषण आहाराचे पाकीट नेऊन यातील भ्रष्ट कारभाराची माहिती देत या पोषण आहाराचा पाढा वाचला. या प्रसंगी तिवसा, वणी, वाघपूर, भोसा, उमरसरा येथील नागरिकांनी या पोषण आहारासंबंधीच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या.
शासनाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या धान्याची गुणवत्ता ही कमी दर्जाची असून सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी याबाबत प्राप्त होत आहे.या येणाऱ्या पाकिटबंद धान्याला तेल, जीरा, मोहरी, हळद, मीठ याचा तडका देण्यात येत आहे. सदर धान्य दोन महिन्याचा पुरवठा एकत्र होत असल्यामुळे व वापरण्यात येणाऱ्या तेलाची गुणवत्ता कमी असल्यामुळे या धान्याला विशिष्ट असा दुर्गंधी स्वरूपाचा वास येत असून काही ग्रामीण भागातील मुलांना उलटी झाल्याच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी शासनाच्या वतीने या गरोदर माता स्तनदा माता व सात महिने ते तीन वर्षातील बालकांना पाकीट स्वरूपात अकराशे ते बाराशे ग्रॅम चना तांदूळ मसूर डाळ मूग डाळ देण्यात येत होतं. तर लहान बालकांना सातशे ग्रॅम धान्य पाकिटात देण्यात येत होत. यावेळी सर्व पालक स्तनदा माता गरोदर माता आपल्या पद्धतीने सदर धान्य शिजवून त्याचा उपभोग घेत होते. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे अनेक अंगणवाडीमध्ये या पाकिटांना नेण्यासाठी कोणतेही पालक उत्साह दाखवत नाही. परिणामी शासनाचे हजारो टन धान्य वाया जात असून खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. शासनाच्या अनेक योजना असून या योजना सर्वसामान्य नागरिकांन पर्यंत पोचविताना ज्या अडचणी येतात त्या सुद्धा शासनाने विचारत घेणे गरजेचे आहे. शासनाने गरोदर, स्तनदा माता व सात महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश जरी चांगला असला परंतु त्याचे परिणाम पाहिजे तसे पहायला मिळत नाही परिणामी यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रात कुपोषणाचे जे प्रमाण वाढत आहे. त्याला या सर्व बाबी सुद्धा कुठे ना कुठे जबाबदार आहेत, जिल्ह्यातील पोषण आहाराला कुपोषणाचा तडका बसत असल्याचा आरोप मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी गेला. जिल्हाधिकारी विकास मीना साहेब व अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे साहेब यांच्या समक्ष जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र, ग्रामीण भागातील बालकांना येणारे तक्रारी तसेच या निकृष्ट दर्जाच्या मालातील तक्रारीचा पाढा याप्रसंगी मनसेच्या वतीने वाचण्यात आला. याप्रसंगी ज्या पालकांना या सर्व समस्या भेडसावत आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सदर धान्य हे निकृष्ट दर्जाचा असून आम्ही हे धान्य मुलांना न देता गुराढोरांना लावतो अशी धक्कादायक माहिती या प्रसंगी दिली. सदर विषय गंभीर स्वरूपाचा असून मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी शासन स्तरावर पाठपुरावा करून लहान चिमुकल्यांना, गरोदर,स्तनदा माता यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा मनसेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळ च्या वतीने शासनाला सदर योजनेद्वारे देण्यात आलेल्या धान्याचा पुरवठा तात्काळ बंद करून नव्याने अंगणवाडी सेविका व प्रशासनाशी चर्चा करून जे धान्य सर्वसामान्य बालक स्तनदा माता गरोदर खातील अशा धान्याचा पुरवठा व्हावा, तसेच संबंधित धान्याच्या पुरवठा करणाऱ्या पुरवठा दारांवर तात्काळ कारवाई करून संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत तपासणी व्हावी जेणेकरून सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनेचा लाभ घेता येईल अशी मागणी याप्रसंगी मनुष्याच्या वतीने करण्यात आली. सोबतच या मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा दारांवर सुद्धा कारवाईची मागणी याप्रसंगी मनसेचे देवा शिवरामवार जिल्हाध्यक्ष मनसे,अनिल हमदापुरे, शिवम नांदुरकर, आकाश उपरे, ईश्वर देऊळकर, प्रथमेश पाटील, एकनाथ राठोड, सोनू गुप्ता, तुषार चोंडके, सौरभ अनसिंगकर, लकी छांगणी, प्रतीक चौधरी, अनिकेत सुरटकर, बबलू मसराम या सहा मनसेचे कार्यकर्ते व ग्रामीण भागातले पालक उपस्थित होते. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री महिला व बालकल्याण विकास, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी यात गांभीर्याने लक्ष देण्यासाठी मनसेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे.