राळेगाव शहराच्या विकासासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कटीबद्ध : आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. अशोक उईके

राळेगाव शहराच्या विकासासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कटीबद्ध : आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. अशोक उईके.

राळेगाव (ता. प्र. )
राळेगाव मतदार संघाचा पालक म्हणून मी सदैव राळेगाव शहराच्या विकासासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कटीबद्ध असल्याचे सांगितले.

स्थानिक आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, इंदिरा नगर व गांधी लेऑऊट निवासी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलतं होते.

राळेगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार ना. प्राचार्य डॉ. अशोक उईके यांची महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्रिपदी निवडी बद्दल तसेच राळेगाव शहरातील तरुण तडफदार नेतृत्व ऍड. प्रफुल्लसिहं चौहान यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच भाजपा तालुका अध्यक्षपदी प्रथमच महिला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सौ. छायाताई पिंपरे यांनी इंदिरा नगर, गांधी लेऑऊट हे माझं कर्मभूमीतील महत्वाचं ठिकाण या भागाचा सर्वांगीण विकास हे माझं प्रथम कर्तव्य असल्याचं सांगितले.
यावेळी सत्कार्मुर्ती भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्लसिहं चौहान यांनी माझा आता पर्यंत नियुक्ती नंतर अनेक ठिकाणी सत्कार झाला मात्र राळेगाव शहरातील ज्या लोकांमध्ये वाढलो, बागडलो, त्या लोकांनी माझा सत्कार केला त्याने मी अतिशय भारावून गेलो हा सत्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे असे सांगितले.
पुढे बोलतांना त्यांनी आपले काही गावाच्या धोरणात्मक कामाबद्दल सांगताना सांगितले की मी राजकारण असो वा समाजकारण करतांना कधीही पक्षीय भेदभाव केला नाही की हा त्या पक्षाचा किंवा त्या जातीचा आपल्याला मिळालेल्या संधीचा आपल्या शहरासाठी, तालुक्यासाठी व जिल्ह्यासाठी कसा होईल यांचा मी सदैव प्रयत्न करणार आहोत आणि मला राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. उईके सर आणि भाजपा तालुका अध्यक्षा छायाताई यांची समर्थ साथ आहेतच.
या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक कुंदन कांबळे, नगरसेविका सौ. कमरूनिस्सा हमीदभाई पठाण, सौ. पुष्पा विजय किन्नाके, मंगेश राऊत, डॉ. कुणाल भोयर उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक आदर्श मंडळाचे फिरोज लाखाणी यांनी तर आभार सैय्यद युसुफअली यांनी मानले.
यावेळी मंडळाचे हमीदभाई पठाण, दिलीप लांभाडे, अमोल पंडित, समीर लाखाणी, शेख रऊप, विजय किन्नाके, रितेश चिटमलवार, वैभव बोभाटे, बंडू थुटूरकर, अनिल राऊत, अभि नगराळे सह सदस्य पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed