साई श्रद्धा हॉस्पिटल च्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू पोलिसात तक्रार दाखल
साई श्रद्धा हॉस्पिटल च्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू पोलिसात तक्रार दाखल
यवतमाळ प्रतिनिधी :- यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या साईश्रद्धा हॉस्पिटल च्या अनागोंदी कारभार व हलगर्जीपणामुळे एका महिलेचा जीव गेला आहे साई श्रद्धा हॉस्पिटल च्या डॉक्टर्स वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतक महिलेच्या पतीने अवधूत वाडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे
ईदु माणिकपुरे या महिलेला अचानक छाती मध्ये जळजळ व मळमळ होत असल्याने तिच्या पतीने 15 डिसेंबर रोजी रात्री दीड वाजताच्या दरम्यान यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या साईश्रद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी तपासणी केली असता ऍसिडिटी मुळे थोडा त्रास होत असल्याचे मृत महिलेच्या पतीला सांगितले, व रात्रभर रुग्णालयातच ठेवा असा सल्ला सुद्धा देण्यात आला, मात्र अचानक सोळा तारखेच्या सकाळी साई श्रद्धा हॉस्पिटल मधून किशोर माणिकपुरे यांना फोन द्वारे तुमची पत्नी मरण पावल्याचे सांगण्यात आले, किशोर माणिकपुरे यांनी कारण विचारले असता साई श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कारण सांगता येत नसल्याचे सांगितल्याचा आरोप सुद्धा यावेळी मृतक महिलेचा पती ने केला आहे, किशोर माणिकपुरे यांनी साईश्रद्धा हॉस्पिटलमध्ये पत्नीला दाखल केल्यानंतर तज्ञ डॉक्टरांना बोलवा असे वारंवार सांगितले मात्र रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, माझ्या पत्नीचा मृत्यू केवळ साई श्रद्धा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप किशोर माणिकपुरे यांनी केला आहे
त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी तक्रार अवधूत वाडी पोलीस स्टेशनला देण्यात आली असून अवधूत वाडी पोलीस साई श्रद्धा हॉस्पिटल च्या संचालकासह डॉक्टर वर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे