मनसेतर्फे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांची उमेदवारी.
मनसेतर्फे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांची उमेदवारी.
भाजपसाठी मोठा धक्का
मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भरला अर्ज.
भारतीय जनता पार्टी तर्फे राजेंद्र नजरधने यांचे नाव निश्चित होणार अशी चर्चा पूर्ण वर्तुळात असतानाच भाजपाने काल तिसऱ्या यादीमध्ये किसन वानखेडे यांना उमेदवारी दिल्याने असंतुष्ट असलेले माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा एबी फॉर्म आणू आज उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपाला फार मोठा धक्का लागू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे .
अनेक वर्षापासून भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता असताना तसेच पन्नास हजार च्या लीडने निवडून आलो असताना मागच्या निवडणुकीत भाजपा पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार थांबलो, परंतु यावेळी निष्ठावंत आमदाराला तिकीट न देता. पक्षावर मालकी हक्क दाखवणाऱ्याच्या मनावर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्याने आपण नाराज असून भाजपाच्या पूर्ण सदस्यत्वाचा राजीनामा दिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्यावतीने फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. असे मत व्यक्त या वेळी माजी आमदार राजेन्द्र नजरधने यांनी केले.
आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा भाऊ
शिवरामवार , उपजिल्हाध्यक्ष देविदास शहाणे , तालुकाध्यक्ष शेख सादिक, यवतमाळचे अमित बदनोरे, आर्णि तालुकाध्यक्ष सचिन वेलगंधेवार , संजय बिजोरे , हिरासिंग चव्हाण , मुकुंद जोशी, राजू पिटलेवाड , दत्ता पिलवंड , सय्यद तौसीफ , सिद्धार्थ घुगरे , अमोल लांमटीळे, विशाल कदम , प्रवीण कणवाळे यासह
असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .