माणिकराव ठाकरे यांचा नामांकन अर्ज दाखल.
माणिकराव ठाकरे यांनी नामांकन अर्ज दाखल.
यवतमाळ : धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमिवर आज मंगळवारी माणिकराव ठाकरे यांनी नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. आज महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचा नामांकन अर्ज भरायचा असल्याने मतदारसंघातील गावागावातून उत्स्फूर्तपणे नागरिकांनीसहभागी झाले होते.यावेळी नामांकन दाखल करताना प्रामुख्याने आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खा.संजय देशमुख, तेलंगणाचे खा. डॉ. रवी मल्लू, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, बाळासाहेब मांगूळकर, आदी उपस्तिथ होते.
अनेक वर्षांपासून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असलेले नैराश्य माणिकराव ठाकरे यांच्या निवडणुकीत उतरल्याने गायब झाले. काँग्रेसच नव्हे तर,उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्तेहीउत्स्फूर्तपणे मिरवणुकीत सामिल झाले.
दिग्रस-आर्णी बायपासवरील मैदानातूननिघालेल्या या मिरवणुकीत हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकारी व सामान्यनागरिकांचा समावेश होता. खा. संजय देशमुख व त्यांच्या शिवसैनिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. माणिकराव ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी आपले कार्यकर्ते जीवाचे रान करेल,असे देशमुख यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनीही आज देशात सत्त्तेसाठी अनेक लोक नितिमत्ता सोडून वागत असल्याचा प्रहार केला. ठाकरे यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यात कुठलाही डाग लागेल, असे काम कधीच केले नाही. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची गंगा आणता येईल असेही ते म्हणाले. नामांकन भरण्यासाठी केवळ पुरुषच नव्हे तर, महिलांचीही
मोठी गर्दी होती.