कुरुंदा गाव कायमस्वरूपी पुरमुक्त करणार – खासदार हेमंत पाटील ; पुरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य किटचे वितरण
हिंगोली /नांदेड : थोडासा पाऊस झाला की कुरुंदा गावात नेहमी पुराचे पाणी शिरते त्यामुळे नागरीकांचे हाल होतात. कुरुंदा येथील पूर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावाला संरक्षण भिंत उभारण्यात येईल व पुढील चार ते पाच महिन्यांत हि संरक्षण भिंत उभारून कुरुंदा गाव कायमस्वरूपी पुरमुक्त करण्यात येणार आहे. असा विश्वास हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.
मागील तीन दिवसापासून होणाऱ्या संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा व किन्होळा या दोन गावात पुराचे पाणी शिरल्याने गावासह शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पुरग्रस्त कुटुंबीयांना खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी ता. 10 रोजी भेट दिली व त्याना अन्नधान्य किटचे वितरण पूर परिस्थितीची पाहणी केली .
तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व गावातील पुरपरस्थितीने गावाचे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.त्यानंतर जिल्हा प्रशासनाला सूचना देत व पुरग्रस्त कुटुंबीयांना कुठल्याही अत्यावश्यक वस्तू व संसार उपयोगी साहित्य कमी पडू देऊ नयेत सुचना दिल्या. सोबतच ज्या शेतकऱ्याचे जनावरे पुरात वाहून गेले त्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मोबदला देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच कुरुंदा गावातील पूरग्रस्त व गावकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही असेही ते म्हणाले . दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी कुरुंदा गावालगत असलेल्या नदीची जिल्हाधिकारी यांच्यासह पहाणी केली व गावाला कायमचे पुरमुक्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना देखील सुचना करून ताबडतोब अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. व पुढील चार महिन्यात संरक्षण भिंत उभारून गावाला कायमस्वरूपी पूर मुक्त करण्याचा निर्धार केला आहे .
यावेळी तालुका प्रमुख राजु चापके, संभाजी सिद्धेवार, जितेंद्र महाजन, दत्ताराम इंगोले, सरपंच राजेश पाटील इंगोले, भय्या दळवी, व्यंकटेश कऱ्हाळे आमदार राजु नवघरे, माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसिलदार अरविंद बोळंगे, उप विभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,यांच्यासह गावकरी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .