यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल का?—-गुरुदेव युवा संघाने केला मुख्यमंत्र्यांना सवाल.
यवतमाळ:-जिल्ह्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत मिळेल का? असा प्रश्न गुरुदेव युवा संघटनेचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी मुख्यमंत्री यांना केला. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले असून या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचे सरकारने पंचनामे केले. असून अहवाल सादर सुद्धा झाले आहे. जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने आदेश सुद्धा दिले. मात्र कृषी विभाग व तलाठ्यांच्या वादामुळे सदर निधी तहसीलदार यांच्या खात्यात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदतीपासून वंचित राहील का व शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारातच जाईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार का गुरुदेव युवा संघाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही परंतु यवतमाळ जिल्ह्यात शेतकरीआत्महत्या झाल्यावरती बळीराजाला पैसे मिळेल का.
बळीराजाला कधी मदत मिळणार असे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी वाट पाहत आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार का असा सवाल गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यानि केला.भारतीय संस्कृती मध्ये दिवाळी हा मोठा सण आहे. मात्र या सणात शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल का. दिवाळीला शेतकऱ्यांची निराशाच हातात येणार का. तसेच दिवाळीला दहा दिवस असताना अद्याप पर्यंत कृषी विभाग व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या बनवल्या नाही असा सवाल गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम करत आहे.
शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला नाही. शेतकऱ्यांना आम्ही निराश करणार नाही असे कागदी घोषणा मुख्यमंत्री करता का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्याला अतिदृष्टीचे पैसे खात्यात जमात झाले पाहिजे नाही.तर संपूर्ण शेतकरी घेऊन आंदोलन करण्याचा इशारा गुरुदेव युवा संघाने केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बुधवार पर्याय पैसे आले नाही. तर रस्त्यावर उतरून आंदोलन केल्या जाणार या वेळेस गुरुदेव युवा संघाच्या अध्यक्षांना सांगितले. या वेळी निवेदन देताना शेतकरी. बयानाबाई वाघाडे,दत्तू मांडळे,किशोर नरांजे,गजानन सहारे,देवकाबाई,महल्ले,राधाबाई सहारे, बायनाबाई नेवारे,समीर बुधावनी,गंगाधर कोहरे,बळीराम कोहरे,अनिल डोंगे,इंदुबाई मोते, सुशीला नेवारे,इत्यादी शेतकरी उपस्थित होते