यवतमाळ (प्रतिनिधी):- केंद्र सरकारने केलेल्या तीन शेतकरी कायद्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू असताना यवतमाळ जिल्हा सक्रिय पाठिंबा आहे. विशेष करून यवतमाळ जिल्ह्यात असणाऱ्या सर्व ग्राम स्तरावरील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती यांना या कायद्या रद्द करा हे निवेदन पोस्टकार्ड पाठविणार असून जिल्ह्यातील एक गाव एक पोस्टकार्ड अशा प्रकारचे पत्र लिहून या कायद्याचा निषेध करण्याची मोहीम यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तारीक शाहीर लोखंडवाला यांनी दिली आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्यामुळे त्याच्यावर अन्याय होता कामा नये अशी शरद पवार यांची भूमिका राहिली आहे.
केंद्र सरकारने केलेल्या तीन कायद्यामध्ये शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत असून याबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेबांना व आम्हाला शेतकरी तथा सामान्य माणसाला कायदे करताना कुठल्याही प्रकारे ची विचारणा केली नाही अशा प्रकारची खंत व्यक्त केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कायद्याचा निषेध करण्याची लाट निर्माण झाली आहे. विशेष करून यवतमाळ जिल्हा जगाच्या नकाशावर ती शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून परिचित असताना या जिल्ह्याने सुद्धा या आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गावकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधामध्ये निषेधाचे निवेदन सादर केले जाणार असून याच सोबत” गाव एक गाव एक पोस्टकार्ड” ही अभिनव निषेधाची कल्पना यवतमाळ जिह्यातुन राबविली जाणार आहेत .हे आंदोलन संपूर्ण देशामध्ये राबविल्या गेल्याने केंद्र सरकारच्या या कायद्याचा निषेध मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा सुद्धा अग्रणी राहणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करावे असा आग्रह असतानाही केंद्र सरकार शेतकऱ्याचे हित साधत नसल्याचे निदर्शनात येत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली येथे आंदोलनाची धग पेटत आहे. तरी प्रत्येक शेतकरी पोशिंदयाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारचे आव्हान तारिक शाहीर लोखंडावाला केल्या गेले आहे.