भाजपा आध्यात्मिक आघाडी द्वारा “दिव्य काशी – भव्य काशी” अंतर्मुख करणारा सोहळा संपन्न
भारतीय जनता पार्टी 🌷आध्यात्मिक आघाडी यवतमाळ शहर भाजपा आध्यात्मिक आघाडी द्वारा “दिव्य काशी- भव्य काशी” अंतर्मुख करणारा सोहळा संपन्न
यवतमाळ प्रतिनिधी :- विश्व गौरावांवित भारताचे कर्मनिष्ठ पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘श्री काशी विश्वनाथ धाम’ विकास कामे लोकार्पणाचा “दिव्य काशी भव्य काशी” सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न झाला.
या सोहळ्याचा थेट प्रसारण समारंभ 13 डिसेंबर रोजी स्थानिक केदारेश्वर मंदिराच्या सभागृहात जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार मदनभाऊ येरावार, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात व भाजपा शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील, जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, प्रदेश आध्यात्मिक आघाडीचे शंतनु शेटे, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष रेखाताई कोठेकर, प्रदेश ओबीसी आघाडीचे राजू डांगे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मायाताई शेरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक ज्ञानेश्वर सुरजुसे, महादेव मंदिराचे विश्वस्त शैलेश दालवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत राम मंदिराचे मनोज औदार्य, ह भ प नलिनी वेरुळकर, गुरुदेव सेवा मंडळाचे भास्करराव गोल्हार, इस्कॉनचे अभीरामजी निताई दास, गुरुद्वाराचे कंवलजित सिंह, केदारेश्वर मंदिराच्या पुजारी रुपाताई गिरी तसेच सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत अरविंदजी तायडे यांचा भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
थेट प्रसारण बघतांना, काशी क्षेत्राचा विध्वंस करणाऱ्या संस्कारशून्य औरंगजेबाच्या विकृत स्मृति जाग्या करीत या क्षेत्राचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना वंदन करीत आपल्या आध्यात्मिक, धार्मिक मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन जेव्हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले, तेव्हा इतिहासाच्या स्मृती जाग्या झाल्या आणि तमाम प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या, असे भावपूर्ण उद् गार सूत्रसंचालन करताना शंतनु शेटे यांनी व्यक्त केले. या सोहळ्याचे विशेष आकर्षण केदारेश्वर मंदिर भजनी मंडळानी वीररसात खड्या आवाजात भावपूर्ण भक्तिरसात भजने गाऊन उपस्थितांची मने जिंकली. केदारेश्वराची महाआरती आणि प्रसाद वितारणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सुरजसे यांनी केले तर आभार आघाडीचे शहराध्यक्ष देवा राऊत यांनी व्यक्त केले. आघाडीचे सहसंयोजक प्रदीप उमरे, ललित काळे, शुभम चोरमले यांनी थेट प्रक्षेपणाची तांत्रिक बाजू सांभाळली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विजय कोटेचा, मनोज इंगोले मोहन देशमुख, अमर दिनकर, बाळासाहेब शिंदे, अजय खोंड, हेमंत दायमा, सुरज गुप्ता, सुनील समदूरकर, वैशाली खोंड, जुगल तिवारी,सचिन व्यास, रोहित राठोड, जयंत झाडे, संजय खडसे,भारत ब्राह्मणकर, उमेश राठोड,सुरज जैन, प्रशांत देशमुख,कीर्ती तायडे, नितीन गिरी, कीर्ती राऊत, पुष्पलता सप्रे, रमेश फुलकर, आशुतोष पटवारी, वासुदेव चांदोरे, कृष्णा माकोडे, गोपाळ कैथवास, प्रियंका भवरे, लता ठोंबरे, विद्या ब्राह्मणकर, वैष्णवी जयस्वाल, सुषमा राऊत, संगीता जाधव, प्रांजली राऊत, श्रीकृष्ण कांबळे, गौरव ब्राह्मणे, भाविन पतिरा, रवी कडव, मंदा नन्नवरे, रेखा नंदुरकर, वासंती झोपाटे, भारती जाठे,माणिक पांडे, रीता धावतोडे, संगीता कासार, शुभांगी हातगावकर, वैशाली लोळगे, शुभम सरकाळे, शुभम चोरमले किशोर मेक्रतवार, गजानन धावतोडे, अभिषेक श्रीवास, मनोज मुधोळकर, किशोर जोतवाणी, संजय शिंदे पाटील, मोहन जाधव, राम गायकवाड, दुर्गा प्रसाद यादव, संदीप सरदार, अस्मित यादव,राहुल यादव, मनोज तिडके, सचिन नक्षणे, आलोक पांडे, मोहन राव, श्रीकांत पात्रीकर, राकेश प्रजापती, साहिल मिश्रा, रामभाऊ, बाळासाहेब वाघ, टीकमचंद पिसे, राजू चिंधे, विष्णू बोबडे, नागोराव काकपुरे,गजानन बरे, पुरुषोत्तम काळे, एस के जीवानी, शुभम जिभकाटे, प्रभाकरराव देशपांडे,प्रसाद विवेकानंद, इंदू जयस्वाल, ठावरी,माधुरी दायरा, शिल्पा मुतलवार,करुणा पाटील, शीला कोटी,चैताली जयस्वाल, रचना शेंडे, संजय भोयर,किशोर भोयर, दीपक करचाल, अजय कोठेकर, सुधीर भोईटे, विजय बाखडे यांचेसह शेकडो नागरिक उपस्थित होते.