मोर्चेकऱ्यांनी केला आमदार इंद्रनील नाईक यांचा विरोध
मोर्चेकऱ्यांनी केला आमदार इंद्रनील नाईक यांचा विरोध
इतके दिवस कुठे होतात जनतेने केला सवाल
प्रतिनिधी पुसद :- काळी दौलत येथे क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून करण्यात आला होता मृत युवकाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुसद येथे काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये आमदार इंद्रनील नाईक आले आमदार साहेब येताचं नागरिकांनी संताप व्यक्त करीत आमदार साहेब इतके दिवस कुठे होतात असा थेट सवाल सुद्धा इंद्रनील नाईक यांना केला आहे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आमदार साहेबांनी मोर्चातून काढता पाय घेतला
।
काळी दौलत येथे शुल्लक कारणावरून श्याम राठोड या तरुणाचा खून करण्यात आला होता मृतक युवकांच्या कुटुंबांना न्याय मिळावा या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने आज पुसद शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्ह्यात व तालुक्यातील अनेक बंजारा बांधव या मोर्चात सहभागी झाले मोर्च्याला संबोधण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक येताच मोर्चेकर्यांनी चांगलाच विरोध करीत संताप व्यक्त केला व तुम्ही आमदार साहेब इतके दिवस कुठे होता असा सवाल करीत नागरिक चांगलेच संतापले प्रकरण चिघळत असल्याचे बघताच आमदार इंद्रनील नाईक यांनी काढता पाय घेत घेतला, या प्रकरणावरून आमदार इंद्रनील नायकांना पुसद मधूनच जोरदार विरोध होताना दिसत आहे