संजीवन हॉस्पिटलला “महाऊर्जा” चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
संजीवन हॉस्पिटलला “महाऊर्जा” चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
यवतमाळ प्रतिनिधी :- महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (महाऊर्जा) (MEDA) या शासकीय कंपनी द्वारे राबविण्यात आलेल्या 16व्या राज्यस्तरीय चाचणी स्पर्धेत येथील संजीवन हॉस्पिटलला (रुग्णालय सेक्टर) प्रथम क्रमांकाचा ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणद्वारे राज्यस्तरावर 16 वी चाचणी स्पर्धा 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली. यात संजीवन हॉस्पिटलसह राज्यातील विविध नामांकित कंपन्यांनी (विविध सेक्टर अंतर्गत) सहभाग घेतला. संजीवनला हॉस्पिटल इमारत अंतर्गत विजेची उपकरणे, त्याचा योग्य वापर, सौरऊर्जा चा वापर, यंत्रसामग्री चा व्यवस्थित पणे वापर आधी बाबी लक्षात घेऊन प्रथम क्रमांकाचा ऊर्जा संवर्धन पुरस्कार जाहीर झाला.
महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण ने ही घोषणा 14 डिसेंबर रोजी ऊर्जा संवर्धन दिनी केली. सदर प्रतिष्ठित पुरस्कार राज्यात हॉस्पिटल स्तरावर संजीवन रुग्णालयाला मिळाला असून ही बाब भूषणावह आहे. या पुरस्काराचे संजीवन मानकरी ठरल्यामुळे व्यवस्थापकीय संचालक डॉ सुनील अग्रवाल, संचालक डॉ सुरेंद्र मुंधडा, डॉ विजय कावलकर, डॉ हर्षवर्धन बोरा, डॉ ललित निमोदीया, डॉ प्रदीप भोजने यांनी आनंद व्यक्त केला आहे. डॉ सुनील अग्रवाल यांनी या पुरस्काराचे श्रेय समस्त कर्मचारी यांना दिले आहे. संपुर्ण राज्यात संजीवन सर्वोत्कृष्ट मानकरी ठरल्यामुळे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून सर्व नागरिकांनी योग्य वापर करावा असे आवाहन डॉ सुनील अग्रवाल यांनी केले आहे.