प्राथमिक आरोग्य केंद्राचा “सोबत खाटा” प्रकार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा यांचा खुलासा दिशाभूल करणारा
प्राथमिक आरोग्य केंद्राचा “सोबत खाटा” प्रकार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा यांचा खुलासा दिशाभूल करणारा-कोरोना काळात कोट्यवधीचा संघटीत भ्र्ष्टाचार करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कारभाराची संपुर्ण चौकशीसाठी मुख्यमंत्र्याना
घाटंजी प्रतिनिधी :-मागील आठवडयात यवतमाळ जिल्ह्यातील आदीवासी बहुल पारवा प्राथमीक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शिबिरामध्ये त्यांनी शिबीराचा फायदा घ्यावा असल्यास “सोबत खाटा” आणा असा फर्मान काढण्यांत आला तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाण्याची व्यवस्था नाही व दारूच्या बाटल्यांचा खच पडला असल्याची वीडियो सह संपूर्ण बातमी टीव्ही वाहिनीवर व वृत्तपत्रात आल्यानंतर कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री ,आरोग्य सचिव ,आरोग्य संचालक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर लोकलाज व प्रशासकीय दबावाखाली मस्तवाल प्रशासनाने जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी यांनी चक्क ही बातमीच खोटी असल्याचा अहवाल दिला असुन या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या अहवालावर या पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रावर बातमीनंतर भेट दिल्यावर सत्य परिस्थिती पाहल्यावर किशोर तिवारी यांनी आपला आक्षेप घेतला असुन ज्याप्रकारे मांजर डोळे बंद करून दूध पिते त्याप्रकारे कोरोना काळात सरकारी पैशाची लूट करणाऱ्या आता सारा संघटीत भ्र्ष्टाचाराची सखोल माहीती किशोर तिवारी मुख्यमंत्री ,आरोग्य सचिव ,आरोग्य संचालक यांच्याकडे सादर केली आहे .
——————————————————————
जिल्ह्यातील कोरोना केअर सेन्टर उघडण्याच्या नावावर जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा शल्य चिकित्सक ,डीन वैद्यकीय महाविद्यालय यांनी शेकडो लोखंडी पलंग ,गादया , बेड शीट ,पडदे ,पिलो सारख्या सर्व वस्तु सरकारी दरापेक्षा दहा पट्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहभागाने विकत घेतले गेले मात्र आज प्राथमिक आरोग्य केंद्रावर रूग्णांना “सोबत खाटा” प्रकार घडत असल्याने आपण व्यधित होऊन ही तक्रार करीत असुन कोट्यवधींची मलाई कोरोना काळात चाटल्याने आरोग्य अधिकारी बिनधास्त झाले असुन पारवा प्राथमिक केंद्रावरील प्रकारावर पांघरून टाकण्याचा प्रकार लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी यावेळी केला .
आरोग्य विभागाने सरकारी जेम पोर्टल वरून न घेता कोट्यवधी रुपयाची आर्सेनिक अल्बम ,पी पी किट ,एन ९५ मास्क ,ट्रिपल लेव्हल मास्क ,हॅन्ड ग्लोज , सॅनिटायझर , अँटिजीन किट , ऑक्सिजन सिलेंडर जम्बो व लहान ,थर्मल गन ,ऑक्सिमीटर ,प्लस मीटर , या सोबत रेमिडिफीवर व तापाच्या गोळ्या यांची सर्व खरेदी संघटीतपणे सरकारी भावापेक्षा कमीत चौपट दराने खरेदी करण्यात आली या पैसा जिल्हा विकास निधी ,जिल्हा खनिज निधी ,खासदार -आमदार स्थानीय निधी मधून असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा शल्य चिकित्सक ,डीन वैद्यकीय महाविद्यालय यांच्या पैसे खाण्याची स्पर्धा दोन सनदी अधिकाऱ्यांच्या संरक्षणात झाल्याने हे अधिकारी आता कोणालाच भीत नसुन रुग्णवाहिका खरेदी ,ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट सारख्या अनेक महागड्या वस्तू महामारीच्या नावावर लोकनिधीची झालेली लुट व त्यांनतर जर प्राथमिक आरोग्य केंद्राची ही अवस्था आहे याला नालायक प्रशासन जबाबदार आहे सनदी अधिकारी आपल्या वातानुकूल कार्यालयाबाहेर जात नाहीत पैसे खाऊन बिनधास्त झालेले अधिकारी स्वतःची चौकशी स्वतःच करतात यालाच आंधळा दळत आहे अन कुत्रे खात आहेत अशी विदारक परिस्थिती असल्याची खंत किशोर तिवारी यावेळी प्रगट केली .
कोरोना काळात झालेल्या प्रत्येक खरेदी बांधकामाची चौकशी करण्यासाठी शेतकरी मिशन आग्रही असुन सर्व लुटारू मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी कमीत कमी तुरुंगात टाकल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असा निर्धार किशोर तिवारी यावेळी व्यक्त केला .
==============================