गेल्या 24 तासात 288 पॉझिटिव्ह ; 303 कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1705 बेड उपलब्ध
ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1995

यवतमाळ प्रतिनिधी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात 288 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 303 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1944 व बाहेर जिल्ह्यात 51 अशी एकूण 1995 झाली असून त्यातील 60 रूग्ण रूग्णालयात तर 1935 गृहविलगीकरणात आहेत.


जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1223 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 288 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 935 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 77154 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 73368 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1791 मृत्यूची नोंद आहे.


आज पॉझिटिव्ह आलेल्या 288 रूग्णांमध्ये 96 महिला व 192 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात 13, बाभुळगाव 13, दारव्हा 37, दिग्रस दोन, घाटंजी 10, महागाव तीन, नेर दोन, पांढरकवडा 47, पुसद 45, राळेगाव 11, उमरखेड एक, वणी 10, यवतमाळ 78, झरी जामणी दोन व इतर जिल्ह्यातील 14 रूग्णांचा समावेश आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 17 हजार 506 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 39 हजार 817 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.44 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 23.55 आहे तर मृत्यूदर 2.32 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1705 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 61 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1705 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 60 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 727 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी 1 बेड उपयोगात असून 856 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed