दादाराव डोल्हारकर यवतमाळ नगर परिषदचे नवे मुख्याधिकारी

दादाराव डोल्हारकर नवनियुक्त मुख्याधिकारी यवतमाळ नगर परिषद,21सप्टेंबर पासून रुजू होण्याचे आदेश
बहुचर्चित यवतमाळ नगरपरिषद मुख्याधिकारी पदावर नवनियुक्त दादाराव डोल्हारकर यांची बदली करण्यात आली आहे. तसे आदेश जारी झाले आहे. ते आधी कारंजा मुख्याधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांना 21सप्टेंबरला यवतमाळ मुख्याधिकारी पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
यवतमाळ नगरपरिषद मुख्याधिकारी पदावर माधुरी मडावी ह्या होत्या. त्यांची बदली रद्द करण्यासाठी यवतमाळ मध्ये अनेक तीव्र स्वरूपाची आंदोलने राज्यभर गाजली आहे.
अखेर आज 20सप्टेंबरच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दादाराव डोल्हारकर यांची यवतमाळ मुख्याधिकारी पदावर वर्णी लागली आहे.