पुसद मध्ये गांजा तस्करी चा पर्दाफाश
पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांची पत्रकार परिषदेत माहिती.
पुसद :- पुसद तालुक्यातील पारध येथून पोलिसांनी 13 किलो गांजा जप्त करून एकाला अटक केली तर एक फरार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी दिली आहे.
रमेश शिवराम जाधव व त्याचा पुतण्या इंदल हिरालाल जाधव असं अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्या आरोपींचे नाव असून यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांना पुसद तालुक्यातील पारध येथे दोघे विक्रीसाठी गांजा बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने पुसद तालुक्यातील पारध येथे रमेश जाधव व इंदल जाधव यांच्या घरी धाड टाकली असता दोन लाख 72 हजार 440 रुपये किमतीचा 13 किलो 582 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून यातील एक आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तर दोघांविरुद्ध एन. डी. पी. एस. ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी दिली आहे.