महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन उपक्रम.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन उपक्रम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असणार अभिवादन करण्यासाठी ‘एक वही एक पेन’ हा उपक्रम राबविण्यात आला. एक वही एक पेन या अभियानांतर्गत अभिवादन करताना जो हार फुलांवर खर्च येतो त्याच मूल्यातून शैक्षणिक साहित्य दान स्वरूपात द्यावे असे आव्हान करण्यात आले होते, व त्या आव्हानाला प्रतिसाद देत राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या अनुयायांनी 50 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य दान केले सदर साहित्य गरीब गरजूवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल.या उपक्रमात मोठ्या संख्येने यवतमाळकरांनी सहभाग घेतला.