भरधाव ट्रक ची ट्रॅव्हल्सला धडक दोन गंभीर तर 13 जण किरकोळ जखमी.
भरधाव ट्रक ची ट्रॅव्हल्सला धडक दोन गंभीर तर 13 जण किरकोळ जखमी.
सुदैवाने जिवीतहानी नाही…
वणी :- भरधाव वेगाने वणीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्स ला जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हल्स ही 50 ते 60 फुट रोडच्या बाजूला फेकल्या गेल्याने . सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना वणी तालुक्यातील वणी – मारेगाव राज्य मार्गावर निंबाळा गावाजवळ आज दि. १ जुन दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली आहे.
प्राप्त माहिती नुसार, ट्रक क्र. एम एच ३४ BZ मारेगाव वरून वणी कडे जात होता. तर विरूध्द दिशेने येणारी ट्रॅव्हल्स (क्र.एम एच १२ kQ 3787) वणी वरून महाराष्ट्र दर्शनासाठी प्रवासी घेवून जात होते. त्यावेळी ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची ट्रॅव्हल्स ला जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की ट्रॅव्हल्स ही ५० फुट रोडच्या बाजूला फेकल्या गेली मात्र कुठलेही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.