पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत राऊत सचिव पदी अमोल ढोणे
यवतमाळ शहरातील महाश्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने अध्यक्ष व सचिव यांच्या निवडीचे आज दिनांक 1 जून 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते.
या निवडणुकीत अध्यक्ष पदाकरता झी 24 तास चे जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत व दैनिक भास्कर चे जिल्हा प्रतिनिधी वीरेंद्र चौबे यांनी फॉर्म भरले होते यावेळी वीरेंद्र चौबे यांना 13 मते मिळाली व श्रीकांत राऊत यांना 43 मते मिळाली यामध्ये अध्यक्षपदाकरता 56 मतदान झाले यामध्ये सर्वाधिक मते घेऊन श्रीकांत राऊत विजयी झाले व सचिव पदाकरता दैनिक दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी अमोल ढोणे व पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी कपिल श्यामकुवर यांनी फॉर्म भरले होते यामध्ये कपिल श्यामकुवर यांना 14 मते मिळाली व अमोल ढोणे यांना 42 मते मिळाली यामध्ये सचिव पदा करिता एकूण 56 मते मिळाली यामध्ये अमोल ढोणे यांनी सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ पत्रकार गणेश बयास व ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे यांनी काम सांभाळले.