आपली गाय दुसऱ्याच्या कळपात जाणे गुराख्याच्या जीवावर बेतले
मारेकरी गुराख्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी
शुल्लक कारणावरून एका गूराख्याने दुसऱ्या गुराख्याला संपविल्याची घटना 22 सप्टेंबरला आर्णी तालुक्यातील अंजनखेडच्या जंगलात घडली.
सदर घटनेतील अटकेतील मारेकरी गूराख्याला पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लक्ष्मण चंपत सिडाम असे मारेकरी गुराख्याचे नाव आहे. तर लक्ष्मण परसराम बोटरे असे मृत्यू पावलेल्या गुराख्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
सदर दोन्ही गुराखी अंजनखेडच्या जंगलात आपापल्या कळपातील गावातील पाळीव गुरे नेहमी चारत होती.
सदर घटनेच्या दिवशी एका कळपातील गाय दुसऱ्या कळपात गेल्याने मारेकरी गुराख्याला या शूल्लक कारणाचा राग अनावर होऊन मयत गुराख्याला काठीने बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान सदर गुराख्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांच्या चौकशी दरम्यान मारेकरी गुराख्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात घटनास्थळी मारेकरी गुराख्याला नेऊन घटनेचे प्रात्यक्षिक इन कॅमेरा मारेकरी गुराख्या जवळून करून घेतले आहे. तसेच महाराणीत वापरलेली काठी घटनास्थळावरून जप्त केली आहे.
सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चूलूमुला यांचे मार्गदर्शनात ठाणेदार केशव ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती वानखेडे, सपोनी प्रशांत देशमुख, सागर दानडे, जमादार मनोज चव्हाण, सतीश चवदार, अतुल तांगडे, नबी शेख, अशोक टेकाळे, पोलिस अमलदार अमोल काणेकर, विशाल गावंडे, समीर बन,अरविंद चेमटे करत आहे.