October 30, 2024

जनावरांची तस्करी करणारे, वाहना समवेत सी सी टीव्ही मध्ये कैद.

जनावरांची तस्करी करणारे, वाहना समवेत सी सी टीव्ही मध्ये कैद.

प्रतिनिधी – यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत किन्ही येथील 23 तारखेच्या मध्य रात्री 2 वाजताच्या दरम्यान रस्त्यावर बसून असलेले जनावरे, यात काही गाई व एक वळू हे बसून असताना यांना प्रथम इंजेक्शन देण्यात आले. त्या नंतर त्या जनावरांना पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये टाकून यवतमाळ कडे घेऊन गेल्याचे किन्ही येथे एका घरी लावण्यात आलेल्या सी सी टीव्ही कॅमेऱ्यात त्यांच्या सर्व हालचाली दिसून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे ग्रामीण परिसरात अनेक वर्षा पासुन जनावरांची तस्करी होत आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आल्या त्याच्या साधी चौकशीहि करण्यात आली नाही, आता मात्र संपूर्ण पुरावे मिळून आले या प्रकरणी 23 ऑक्टोंबर ला तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या चौकशीचे पोलिसांनी अजूनपर्यंत पाऊल उचलले नासल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह दिसून येत आहे विशेष म्हणजे किन्ही येथील जनावरे नेण्या करिता आलेले तीन तस्कर सी सी टीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे. तर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ चे काचास काळी फिल्म लाऊन असल्याने कारच्या आत मध्ये काहीच दिसत नसल्याने अशा संशयित वाहन धारकानवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पशू पालकांची मागणी आहे. भविष्यात जनावरांची तस्करीला आळा बसेल जनावरे सुखरूप राहील असा आशावद व्यक्त करण्यात येत आहे. हे तस्करी करणाऱ्याची मोठी साखळी असून पोलीस सापडलेल्या पुराव्या वरून अनेक तस्करांच्या मुसक्या आवळण्यार का ? या कडे ग्रामीण पशुपालक व शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. हिवरी, भांब, किन्ही, अर्जुना या परिसरातील शेकडो जनावरे गायब झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed