
“प्रतिभा धानोरकरांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यानीं केली फटाक्याची आतीषबाजी”
आर्णी:- लोकसभा निवडनूकी साठी बर्याच दीवसापासुन काँग्रेस कमीटीची आर्णी चंद्रपुर लोकसभेची उमेदवारीचा मार्ग सुटेना शेवटी दिनांक 24 मार्च रवीवार पाचवी यादी जाहीर केली असता या यादीमध्ये महाराष्र्टातील चंद्रपुर जागेचा समावेश असुन या ठीकाणी वरोरा विधानसभा मतदार संधाचे तथा काँग्रेस कमेटी चे दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांच्या पत्नि प्रतीभा धानोरकर यांना काँग्रेस कमेटी ने उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामूळे आता काँग्रेस कडुन चंद्रपुर लोकसभेचा मार्ग मोकळा झाला असल्याने काँग्रेस कमेटीच्या नेत्यांना च नाही तर संपुर्ण कार्यकर्त्याना सुध्दा आनंद झाला आहे.दीवंगत खासदार बाळु धानोरकर यांच्या निधनानंतर चंद्रपुर लोकसभा लढविन्यास प्रतीभा धानोरकर या ईच्छुक होत्या परंतु या जागेवर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवनी ला मीळावी म्हणून शेवट पर्यन्तं आग्रही होता.पण या मतदार संघातील जन भावना लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने शेवटी दिवंगत बाळु धानोरकर यांच्या पत्नि प्रतीभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली.उमेदवारी जाहीर होताच आर्णी येथील काँग्रेस कमेटीचे माजी मंत्री शीवाजीराव मोघे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतीषबाजी केली…..