जातीला मूठमाती दिल्याशिवाय पर्याय नाही -अरविंद माळी

यवतमाळ प्रतिनिधी:-प्रागैतिहासिक कालखंडापासून आजपर्यंतचा इतिहास हा परिवर्तनाचा इतिहास पाहिलेला आहे मातृसत्ताक संस्कृतीमध्ये समानतेचे वैशिष्ट आपणास पाहायला मिळतात परंतु हळूहळू कालांतराने वैदिक संस्कृती मध्ये श्रमिकांच्या शोषणाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर जातिव्यवस्थेचे वलय निर्माण झालं त्यामुळे जाती भारतामध्ये घट्ट करण्याचे षडयंत्र हे वैदिक संस्कृतीने आखलेला आहे त्यामुळे भारतामधील विकासाचा आणि उन्नती चा सर्वात मोठा अडसर आहे तिला मूठमाती दिल्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन स्मृती पर्व 2020 च्या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानमालेत सत्यशोधक संस्कृती स्वीकारल्याने ओबीसी प्रवर्गाचे कल्याण होणार आहे या विषयावर सत्यशोधक प्रबोधनकार नागपूर येथील अरविंद माळी यांनी व्यक्त केले
समर सत्तेच्या नावाखाली संस्कृतीमध्ये भेसळ केली जाते वास्तविक कहा संस्कृतीच्या अभ्यासा पूर्वी सत्यशोधक बदलणे अत्यंत गरजेचे असून सत्यशोधक आणि माणसाच्या बुद्धीचा विकास होतो त्यामुळे या सत्य संस्कृतीचा जर आपण स्वीकार केला तर परिवर्तनवादी प्रवाहांमध्ये आपला विजय सहज राहू शकतो सत्य हे सार्वत्रिक असते आणि ते लोकांच्या उपयोगी असते त्यामुळेच त्याचा परिणाम हा येणाऱ्या भविष्यातील पिढीवर होत असतो संस्कृतीमध्ये बुद्धीचा उपयोग करीत असताना विश्लेषणात्मक सत्य मांडत मानवाला बुद्धीचा उपयोग करून निसर्गावर निसर्गाच्या मदतीने चांगलं जगण्याची कृती म्हणजे संस्कृती होय असे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये श्रोत्यांना माळी यांनी सांगितले आज मानवाचं जानवरी करण झालेला आहे जनावरासारखा माणूस वागायला लागलेला आहे त्यामुळे दोन गोष्टी प्रामुख्याने आज गरजेचे आहेत बुद्धीला विकसित करता येते आणि मांडला सेट करता येते हे सुत्र आता मानवाने समजून घेतले पाहिजे जानोआणि मानो ही प्रक्रिया सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे त्यामुळे ज्ञान जर जीवन जगण्याची कला शिकवीत असेल तर संस्कृती ही कलेवर अवलंबून असते त्यामुळे तिचा उपयोग सुद्धा आता आपल्याला करून घ्यायचा आहे क्रांती आणि प्रतिक्रांती चा इतिहास गेल्या अनेक दिवसापासून आपण चिकित्सक दृष्टीकोनातून स्वीकारला पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोन संस्कृतीतील संघर्ष कसा होता त्याचे अवलोकन करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे सम्राट अशोकाने सत्यशोधकीय आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारांच्या प्रचारार्थ निर्माण केलेले 84000 प्रशिक्षण केंद्र आज कुठे आहेत याबाबतची सुद्धा चिकित्सा होणे तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे जाती व्यवस्थेतील जात नाहीशी करून आदर्श संस्कृतीला स्वीकारत सत्यशोधक संस्कृती हीच तुमच्या उन्नतीचे महत्त्वाचं कारण राहू शकते असेही त्यांनी ठामपणे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना फस्त केलं रोटीबेटी व्यवहार जात निर्मूलन स्त्रियांचा दर्जा परकीय आक्रमणाची कारणं आणि दुसऱ्यावर टीका करीत असताना आपली विवेकबुद्धी सातत्याने जागृत ठेवण्याचे सुद्धा त्यांनी आवाहन यावेळी केलं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचार झाले मध्ये क्रांतीचे बीज दडले आहेत हे त्यांनी ठामपणे सांगितलं आणि म्हणून आपण सत्यशोधक संस्कृती स्वीकारत असताना ओबीसींनी सुद्धा आता विवेकतेचा उपयोग करून घेतला पाहिजे
यावेळी अध्यक्ष म्हणून रवींद्र गावडे सत्यशोधक विचारवंत यवतमाळ तर अतिथी म्हणून ज्ञानेश्वर गोरे अरुण मेहेत्रे डॉक्टर दिलीप गावडे अशोक्राव तिथे प्राध्यापक काशिनाथ लाहोरे डॉक्टर विजय कावलकर विठ्ठलराव नागतोडे दिलीप बेलसरे सागर काळे अशोक मोहुरले सविता हजारे प्राध्यापक दीपक वाघ माया गोरे माधुरी नाले इत्यादींची उपस्थिती होती या व्याख्यानमालेची प्रस्तावना रवी नागरीकर यांनी केली संचालन शीतल बोराडे यांनी केले तर आभार मोहन लोखंडे यांनी मानले