प्रतिभा फाउंडेशन कडून पारधी बेडा वस्तीगृहात 40 मुलींना खाऊ वाटप आणि शिक्षणाचे मार्गदर्शन.

प्रतिभा फाउंडेशन नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहत असल्याने यवतमाळला लागून असलेल्या वाघाडी येथे प्रतिभा फाउंडेशन आदिवासी मुलींच्या पारधी बेडा वस्तीगृहमध्ये जाऊन तेथील 40 मुलींना फराळ ,फळ खाऊ वाटप केले आणि शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले.
हे वसतिगृह पापीता ईसू माडवे आणि लक्ष्मण माडवे हे वस्तीगृह चालवतात त्यामुळे शाल श्रीफळ आणि साडी देऊन पपीता ताई. चां सत्कार प्रतिभा फाउंडेशन ने केला. तसेच यानंतरही आमचे फाउंडेशन आपणास मदत करेल असे आश्वासन दिले. यावेळी प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा पवार, डॉ.सुधा खडके, सचिन शेळके, अभिषेक यादव, ज्योती वाघमारे उपस्थित होते.