January 16, 2025

भरधाव दुचाकीच्या धडकेत चालकासह एक इसम गंभीर जखमी.

भरधाव दुचाकीच्या धडकेत चालकासह एक इसम गंभीर जखमी.

रिधोरा गावाजवळील घटना.

 

राळेगाव:- भरधाव दुचाकीचालकाने रस्त्याने पायदळ जाणाऱ्या एका इसमाला जबर धडक दिली, या अपघातात दुचाकी चालकासह एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना वडकी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधोरा गावाजवळ बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३०वाजताच्या सुमारास घडली. देवराव गुडदे वय ७२ वर्ष रा.रिधोरा असे जखमी इसमाचे नाव आहे, तर राम अशोक जोगी वय २९ वर्ष असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालक राम जोगी हा आपल्या दुचाकी क्र एम एच ३२ एन २३०९ ने वडकी वरून वाढोना कडे जात होता. दरम्यान रिधोरा गावाजवळ रस्त्याने पायी जात असलेल्या देवराव गुडदे या इसमाला दुचाकी चालक राम जोगी याने मागाहून जोराची धडक दिली. यामध्ये देवराव गुडदे यांच्या पायाला गंभीर मार लागल्याने मोठी दुखापत झाली, तर दुचाकी चालक राम जोगी याला सुद्धा डोक्याला गंभीर मार लागल्याने दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे व पोलिस अंमलदार अविनाश चिकराम हे घटनास्थळी दाखल झाले व जखमींना पुढील उपचारार्थ सेवाग्राम येथे हलविण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *