लाचखोर भूमापक अडकला एसीबीच्या जाळ्यात
लाचखोर भूमापक अडकला एसीबीच्या जाळ्यात.
घराच्या मिळकतीवरील मयत महिलेचे नावं कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणे भोवले.
शासकीय कार्यालयांना भ्रष्टाचाराची किड
भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण हा सिद्धांत संपूर्ण जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयाला लागलेला आहे कोणतेही काम भूमी अभिलेख कार्यालयात करण्यासाठी गेल्या नंतर ते सहजपणे होईल असे कधी होत नाही त्या कामासाठी लाच मागितल्या जाते छोटयाशा कामाला तीन ते सहा महिने अवधी लागतो मात्र लाच दिली की हे काम आठवड्याभरातच होते राळेगाव भूमि अभिलेख कार्यालयातील भूमापकाला दहा हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रुचून रंगेहात पकडल्याने या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
राळेगांव :- राळेगाव वडीलोपार्जित जुन्या घराच्या मिळकतीवरील मयत झालेल्या महिलेचे नाव मिळकत पत्रीकेवरून कमी करण्याकरीता दहा हजार रूपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर परीरक्षण भूमापक (वर्ग ३) याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांनी येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सोमवारी (ता.६) केली. या कारवाईने कार्यालयात एकच खळबळ उडाली
अजय नारायण देशमुख वय ५० वर्ष, पद परीरक्षण भूमापक, वर्ग ३. नेमणुक उपअधीक्षक भूमी अभिलेख, राळेगाव, जि. यवतमाळ असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. राळेगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात अजय नारायण देशमुख वय वर्ष ५० यांनी तक्रारकत्यांकडून दहा हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदार यांच्या आई मृत्यू पावल्याने तिचे नाव मिळकत पत्रिकेवरून कमी करायचे होते. यासाठी तक्रारदाराने रितसर अर्ज भूमी अभिलेखकार्यालयात दिला होता. सदर अर्ज देताना त्याची नोंदीची पावती देखील घेतली होती. नियमाप्रमाणे सात ते नऊ दिवसात अर्ज निकाली काढणे गरजेचे असतांना
अजय नारायण देशमुख यांनी त्यांचा अर्ज निकाली न काढता तो फाईलमध्ये ठेवून दिला त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्याशी भेटून चर्चा केली त्यावेळी त्यांनी दहा हजार रुपये मागितले दरम्यान तक्रारदारांनी दहा हजार रुपये देण्याचे कबूल केले आणि भूमापकाची तक्रार यवतमाळ येथील लाचलुचपत विभागाकडे केली. विभागाने लाच देण्याची तारीख आणि वेळ निश्चित करून तशी माहिती तक्रारदाराला दिली आणि तक्रारदाराने देखील सहा जानेवारीला पैसे देतो असे सांगितले, दरम्यान आज उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असणारे लोकसेवक अजय नारायण देशमुख यांना दहा हजार रुपयांची लाच पंचा समक्ष देताना आधीच या ठिकाणी सापळा रचून बसलेले लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अजय देशमुख यांना रंगेहात पकडले. याबाबतची तक्रार आणि घटनास्थळावरील पंचनामा राळेगाव
पोलीस स्टेशनला पुढील कारवाईसाठी देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिन्द्र शिदि अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन घनवट तसेच पोलिस अमलदार अतुल मते अब्दुल क्सीम सचिन भोईर सुधीर कांबळे राकेश सावसाकडे गोवर्धन वाडी संजय कांबळे यांनी केली.