उमरखेड येथे रस्त्यासाठी नागरिकाचे आंदोलन, प्रशासनाची उडाली तारांबळ.
उमरखेड येथे रस्त्यासाठी नागरिकाचे आंदोलन, प्रशासनाची उडाली तारांबळ.
उमरखेड ते ढाणकी रोडचे काम मागील सहा महिन्यापासून संथ गतीने चालू असल्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच जनतेला मोठा धुळीचा त्रास होत आहे. या मार्गावर गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय, मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल तसेच एमआयडीसी आहे. हा महत्त्वाचा म्हणजे किनवट जाणारा मार्ग असून या रस्त्यावर अनेक वाहने येणे जाणे करत असतात परंतु मागील सहा महिन्यापासून कंत्राट दाराने रस्ते उखडून ठेवले असून बाजूने असणाऱ्या दुकानदारांना धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यांना धुळीमुळे अनेकांना विकार होत आहे त्यामुळे आज व्यापारी वर्गांनी ढानकी रोडवर आंदोलन केले मोठमोठ्या घोषणा दिल्या व जनता आक्रमक झाल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री प्रमोद दुधे, इंजिनिअर ढोले हे उपस्थित झाले त्यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती यावेळी पोलीस प्रशासन आले व दोघांची मध्यस्थी करून लवकरात लवकर रस्त्याचे काम चालू होऊन जनतेला त्रास होणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले यावेळी अनेक व्यापारी उपस्थित होते.