जनसंर्घष अर्बन निधी बॅक बंद च्या वाटेवर, ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना
जनसंर्घष अर्बन निधी बॅक बंद च्या वाटेवर, ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना, ठेवीदार आक्रमक.
यवतमाळ जिल्ह्यातील जन संघर्ष अर्बन निधी या बँक ने गेल्या काही दिवसा पासून व्यवहार बंद केल्याने ग्राहकांना पैसे परत दिल्या जात नाही. त्यामुळे ठेवीदार संतापले असून त्यांनी दारव्हा, दिग्रस , आर्णी या ठिकाणच्या शाखेत चांगलाच गोंधळ घातला असून आपल्या ठेवी परत मागितल्या आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जनसंघर्ष अर्बन निधी बँक ली . या बँकेच्या सात शाखा आहे. बँकेने सुरवातीला ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्या नंतर त्यांना आकर्षक व्याज दर देण्याचे अमिष दाखविले. त्या वर ग्राहकांनी विश्वास ठेऊन या बँकेत ठेवि दील्या. व्यवस्थित व्याज दर मिळत असल्याने काहींनी तर निवृत्ती नंतर मिळालेली सर्व रक्कम बँकेत फिक्स केले. अशा प्रकरणे बँकेने सर्वसामान्य ग्रहाकाकडून कोट्यवधी रू च्या ठेवी घेतल्या. काही दिवसांपर्यंत ठेवीदारांना दर महिन्याला व्याजाचा व्यवस्थित परतावा देण्यात आला. मात्र दोन दिवसापूर्वी या बँकेला कुलूप ठोकण्यात आले. ही बाब ठेवीदारांना माहीत होताच बँकेसमोर मोठी गर्दी केली . तेव्हा कर्मचारी ठेवीदारांची समजूत काढत होते मात्र ग्राहक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते
ठेवीदारांनी बँकेचे अधिकारी आणि संचालकांना फोन करून आपल्या ठेवी संदर्भात माहिती मागण्याचा प्रयत्न केला .मात्र सर्वांचेच फोन बंद असल्याने ग्राहक अधिक संतापले आणि त्यांनी बँकेच्या कार्यालयात गोंधळ घातला.