शेतकऱ्यांच्या हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करा व सध्याचा केंद्र सरकारने केलेला काळा कायदा रद्द करा ! हरिष कुडे
यवतमाळ प्रतिनिधी:- शतकानुशतके शेतकरी राजा हा नागवल्या जात असून याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत स्मृति पर्व च्या वतीने आयोजित मराठा सेवा संघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपले परखड विचार मांडत असताना हरीश कुडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या.
याबाबत आपले परखड विचार मांडत असताना त्यांनी बहुजनांचा नायक म्हणून कांशीरामजी चळवळीपासून माझी सुरुवात झाली असून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचा अभ्यास करत असताना शेतात शिवाजी महाराजांच्या शेतकरी धोरणाविषयी आपले स्पष्ट मत करत असताना राज्याच्या धोरणाचा विशेष उल्लेख करत त्यांनी सांगितले की उभ्या पिकाला हात लावण्याची हिंमत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नव्हती परंतु शेतकऱ्यांच्या गळा कापण्याची हिम्मत हे सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली विशेष म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सहानुभूती दिल्या जात नसून उलट त्यांचे शोषण कसे होईल हे सुद्धा त्यांनी आकडेवारीवरून आणि शेतकऱ्यांच्या मालाच्या भावावरून स्पष्ट केले सोन्याच्या आणि कापसाच्या भावाची तफावत व्यक्त करत असताना त्यांनी सांगितले एकेकाळी कापसाच्या भाव हा सोन्याच्या भावापेक्षा बहुमूल्य होता मात्र आज शेतकऱ्यांच्या मालाला कुठल्याही प्रकारचा भाव नसल्याचे स्पष्ट केले आणि याला जबाबदार सरकारच असल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी यावेळी केला विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीही राहत नसून उत्पादनाचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे हे शोषण करणारी व्यवस्था पालटून टाकली पाहिजे आणि बहुजनांनी आता आपल्या हक्काची लढाई लढली पाहिजे असे प्रतिपादन कुडे यांनी केले याच वेळी त्यांनी शासनाच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या योजना सुद्धा फसवे असून शेतकऱ्यांना वारंवार नतमस्तक होण्यासाठी भाग पडत आहेत एक एकर जमिनीचा मालक असणारे शेतकरी आज दर दर मजुरीसाठी भटकत आहे. त्यामुळे याला दोषी कोण याबाबत विचारमंथन झाले पाहिजे दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला खुला पाठिंबा द्या आंदोलन आपल्या बहुजनांच्या आंदोलन आहे केंद्राने केलेले तिन्ही काळे कायदे रद्द करण्यात यावे अशी परखड टीका करीत असताना घरातील प्रत्येक माणसाने आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या परिसंवादामध्ये अध्यक्षपदाच्या आणि प्रस्तावनेच्या प्रमुख भूमिकेत असणारे डॉ. दिलीप महाले यांनी आपलं परखड मत व्यक्त करत असताना आता ही लढाई शेवटची आहे. आता जर लढले नाही तर कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही त्यामुळे आता तुमची लढाई तुम्हीच हक्काने लढली पाहिजे आणि येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप महाले प्रमुख पाहुणे ,सुनील कडू, ज्ञानेश्वर गायकवाड नंदूभाऊ बुटे,महेंद्र वेळुकर, शशिकांत खडसे, विनायक देशमुख यावेळी यावेळी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनामध्ये गुरमीत सिंग लहरा हे शहीद झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली व नंदूभाऊ बुटे यांनी बीज भाषण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण भाऊ भोयर संचालन देव डेबरे आभार प्रदर्शन रवींद्र नीमट यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन पुंडलिक बुटले, प्रवीण देशमुख ,योगीराज अडसोड, राजू भोयर, विनोद डाखोरे, प्रशांत वानखेडे, अजय बेंडे, विनोद नराळे, विजय ठाकरे, मंगेश फुटाणे, प्रणल वानखडे, अजय गावंडे, अंकुश वानखडे, पंकज इंगळे, सुमित राऊत, किशोर चव्हाण, विशाल चुटे, राजेंद्र गव्हाणे, अविनाश देशमुख, प्रसाद दुबे, प्रदीप इंगोले, प्रशांत कडू, किशोर पारटकर,दीपक निचळ, खुशाल ठाकरे, प्रज्वल खडसे, संजय इंगोले यांनी केले.