5 डिसेंबर रोजी महंताई तसेच विशाल भंडाराचे आयोजन
यवतमाळ -दि. 5 डिसेंबर 2020 रोजी यवतमाळ येथील श्री बालाजी मंदिर बालाजी चौक यवतमाळ येथे महंताई (चादर विधी) तसेच विशाल भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ प्रदेशातील अनंत विभुषित विष्णु स्वामी संप्रदाय अखिल भारतीय चतुः संप्रदाय अनंत विभूषित परम पुज्य श्री. महंत रामलखनदासजी महाराज यांच्या स्वर्गवासानंतर प्रथम प्रवेश महोत्सवानिमित्त पुज्य बाबाजी महाराज यांच्या भंडारा महाप्रसाद महोत्सवात संपूर्ण देशातील संत व भक्तगण उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी चादर विधी महामंडळेश्वर संगीत कृष्ण सावरिया बाबा यांना विधीवत सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्री पंच निरमोही अनी अखाडाचे अध्यक्ष परमपुज्य श्री महंत राजेन्द्रदासजी महाराज हे राहणार असून अखिल भारतीय विष्णुस्वामी अखाडाचे अध्यक्ष परमपुज्य महंत विजेन्द्रदासजी महाराज हे प्रामुख्याने आवर्जुन उपस्थित राहणार आहे.
महंताई व विशाल भंडारानिमित्त दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता राणी सती मंदीर तलावङ्गैल येथून भव्य शोभायात्रा निघणार असून या शोभायात्रेत देशभरातून आलेल्या जवळपास 150 महंत व संतांची विशाल शोभायात्रा ढोल ताश्याच्या गजरात भजन मंडळी, धर्म ध्वजा घेऊन घोडेस्वार, आकर्षक रथ व महंत बाबा रामलखनदासजी महाराज यांचे शेकडो भक्त या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. ही शोभायात्रा राणी सती मंदिर तलावङ्गैल येथून प्रारंभ होवून लोखंडी पूल, गांधी चौक, श्याम टॉकीज चौक, मेन लाईन, सराङ्ग अली चौक, टांगा चौक, सरदार चौक, मारवाडी चौक, बालाजी चौक मार्गक्रमण करीत कार्यक्रम स्थळी पोहोचेल. या शोभायात्रेच्या स्वागतासाठी जागोजागी स्वागत कमानी व रांगोळी काढण्यात येणार असून पुष्पवृष्टीने साधु संतांचे व शोभायात्रेत सहभागी भक्तगणांचे यवतमाळकरांच्या वतीने जंगी स्वागत होणार आहे. या शिबीरात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आ. संदीप बाजोरिया व समस्त शिष्यगण, भक्तगण बालाजी मंदिर यवतमाळ यांनी केले आहे.