फायनान्स कंपनीच्या अभिकर्त्याला लुटणारी टोळी गजाआड.
फायनान्स कंपनीच्या अभिकर्त्याला लुटणारी टोळी गजाआड.
साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
यवतमाळ – एका खासगी फायनान्स कंपनीच्या अभीकर्त्याला वाटेत अडवून चाकूच्या धाकावर पावणे तीन लाखांची रोकड पळविणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. तसेच आरोपींकडून रोखेसह चार लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अजय पंधरे (२५), सचिन कोराम, संग्राम घोडाम (१८) तीघेही रा. मेटीखेडा, दुर्गेश डवरे (२०), अरविंद आगोसे (२७) दोघेही रा. गाडीवन, ता. उमरखेड, तसेच साईप्रसाद कोटवाड (२४) रा. मंगरुळ, जि.नांदेड असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर संदेश ढोकणे (२१) रा. दिघी क्रं २ असे लुटण्यात आलेल्या अभिकर्त्याचे नाव आहे. तो भारत फायनान्स कंपनीत बचत गटांना वितरीत केलेल्या कर्जाची वसूली करण्याचे काम करतो. तो १६ जानेवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास लखमापूर येथून कापऱ्याकडे दुचाकीने जात होता. दरम्यान मागावर असलेल्या काही भामट्यांनी त्याला अडविले. तसेच धारदार चाकूच्या धाकावर त्याच्याकडील रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला. घटनेनंतर त्याने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात तीन भामट्यांविरुद्ध भा.न्या.सं. ३०९ (४) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तत्काळ उघडकीस आणण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक यांनी एलसीबीला दिले. दरम्यान ४ फेब्रुवारीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असतांना गोपनीय माहिती मिळाली, एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हे दुचाकीने सावरगड दर्गा येथे येत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. तसेच संबधीत आरोपी हे संशयीतरित्या आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडून दोन लाख २८ हजारांची रोख, सहा मोबाईल अंदाजे ६६ हजार रुपये व दोन दुचाकी वाहने एक लाख ६० हजार असा एकूण चा लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर ० पुढील कारवाई करण्यासाठी आरोपींना यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश वैसाने, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतिश चवरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लु, बंडू डांगे, सै. साजिद, योगेश गटलेवार, अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, विनोद राठोड, रितुराज मेडवे, आकाश सहारे, धनंजय श्रीरामे, देवेंद्र होले, आकाश सुर्यवंशी, कविश पाळेकर, दिगांबर पिलावन, योगेश टेकाम आदी कर्मचाऱ्यांनी केली.