रामकृष्ण नगर रिकामे करण्यासाठी भुमाफिया कडून धमकी
पोलीस अधीक्षकांचे चौकशी करण्याचे आदेश
प्रतिनिधी यवतमाळ :- यवतमाळ शहरालगत असलेल्या मालानी नगर जवळ असलेल्या रामकृष्ण नगर येथील नागरिकांचे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून वास्तव्य आहे, गेल्या एक महिन्यापासून यवतमाळ शहरातील भूमाफिया प्रदीप लाखांनी, प्रमोद राय, हे रामकृष्ण नगर येथे गावगुंडांना पाठवून येथील नागरिकांना धमकावीत असल्याने भू माफियांवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले
यवतमाळ शहरालगत मलानी नगर जवळ असलेल्या रामकृष्ण नगर येथील नागरिक गेल्या दहा ते बारा वर्षांपासून वास्तव्य आहे, गेल्या एक महिन्यापासून येथील नागरिकांना यवतमाळ शहराचे भूमाफिया प्रदीप लाखांनी व प्रमोद राय हे रामकृष्ण नगर खाली करून द्या, ही जागा आमची आहे असे म्हणून शहरातील गावगुंडांना पाठवून धमकावीत असल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, रामकृष्ण नगर येथील नागरिक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यातच गाव गुंडांकडून धमक्या येत असल्याने येथील नागरिकांचे काम धंदे बंद आहे, सध्या रामकृष्ण नगर येथील नागरिक प्रचंड दहशत असून लाखांनी व राय या भुमाफियांवर कठोर कार्यवाही करा या मागणीचे निवेदन गुरुदेव संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांना देण्यात आले पोलिस अधीक्षकांनी गुरुदेव युवा संघाच्या निवेदनाची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांना चौकशीचे आदेश दिले आहे
संबंधित भुमाफियांवर कारवाई करा अन्यथा गुरुदेव संघाच्या वतीने रामकृष्ण नगर येथील नागरिकांसोबत तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी दिला आहे