जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत द्वारा माहिती व पत्रकाचे विमोचन
जागतिक ग्राहक हक्क दिना निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत द्वारा बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे माहिती पत्रकाचे विमोचन.
यवतमाळ :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत यवतमाळ द्वारा दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक प्रकारचे समस्यांना सामोरे जावे लागते व तक्रार कोठे करावी यासाठी अनेक ग्राहकांना माहिती नसते.
याच समस्येवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत यवतमाळ यांनी अनेक सरकारी विभाग यांचे नाव , कार्यालयीन अधिकारी त्यांचे मोबाईल नंबर असलेले पत्रक काढून त्याचे विमोचन मा. उपजिल्हाधिकारी अनिलजी खंडागळे यांचे हस्ते केले याप्रसंगी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच सचिव ग्राहक संरक्षण परिषद श्री सुधाकरजी पवार , अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रांत अध्यक्ष डॉ नारायण मेहरे , चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू निमोनिया, वजन व मापे विभागाचे गजाननजी पोहनकर उपस्थित होते.या माहिती पत्रकाचे मार्गदर्शक जिल्हा संघटक हितेश सेठ, प्रकल्प अधिकारी डॉ. शेखर बंड होते. यावेळी ग्राहक पंचायत यवतमाळ चे कार्यकर्ते अनंता भिसे , संजय जोशी, संतोष डोमाळे राधामल जाधवाणी, प्रकाश चनेवार , जिनेन्द्र बंगाले, उमेश पकाले, प्रवीण पाटील, दिलीप जैन ,अविनाश धनेवार व कार्यकर्ते उपस्थित होते.