महसूल विभागाच्या वेगवेगळ्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक प्रकरणी दोन ट्रॅक्टर जप्त.

महसूल विभागाच्या वेगवेगळ्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक प्रकरणी दोन ट्रॅक्टर जप्त.

राळेगाव  :- महसूल विभागाच्या पथकाने वेगवेगळ्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक प्रकरणी दोन ट्रॅक्टर जप्त केले.

तालुक्यातील रिधोरा फाट्याजवळ अवैध रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर महसूल अधिकाऱ्यांच्या गळाला लागला असुन तहसीलदार अमित भोईटे यांनी दि १२ मार्च बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हि कारवाई केली.
तर दुसऱ्या कारवाईत मंडळ अधिकारी महादेव सानप,तलाठी एन,जे देवळे यांनी आज दि १३ मार्च रोजी सकाळच्या दरम्यान येवती येथे वाळूची अवैध वाहतूक प्रकरणी एक ट्रॅक्टर जप्त केला.
उपविभागीय महसूल अधिकारी विशाल खत्री यांनी मागील आठवड्यात झुल्लर घाटातून तब्बल दहा ट्रॅक्टर जप्त केले.त्यानंतर महसुल पथकाने तीन दिवसांपूर्वी बोरी मेंगापुर घाटातून तीन ट्रॅक्टर जप्त करुन दंडात्मक कारवाई केली. राळेगाव महसूल प्रशासनाची तालुक्यातील वाळू तस्करांमध्ये सध्या दहशत कायम असताना पुन्हा वेगवेगळ्या कारवाईत अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर महसूल अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याने दहशतीत पुन्हा भर पडल्याचे दिसून येत आहे.राळेगांवचे तहसीलदार भोईटे हे शासकीय वाहनाने कामानिमित्त वडकी मार्गे पांढरकवडा कडे जात असताना रिधोरा फाट्याजवळ अवैध वाळू भरलेला एम.एच.२९ व्हि.४१५५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरची यांनी तपासणी केली असता त्या ट्रॅक्टर मध्ये एक ब्रास वाळू भरल्याचे दिसून आले.सदर ट्रॅक्टर मयुर जुमनाके यांच्या मालकीचा असुन लाडकी नाल्यांची रेती भरून रिधोरा गावाकडे जात असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.तर दुसऱ्या कारवाईत मंडळ अधिकारी महादेव सानप व तलाठी एन,जे देवळे यांनी तालुक्यातील येवती येथे अवैध वाळूने भरलेला एम,एच २९ सी,जी ०४९३ या ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्या ट्रॅक्टर मध्ये एक ब्रास वाळू भरल्याचे दिसून आले.सदर ट्रॅक्टर विकास पुंडलीकराव सेवेकर रा,येवती यांच्या मालकीचा असुन सदर दोन्ही ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाई पूर्ण होईपर्यंत वडकी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed