72
यवतमाळ प्रतिनिधी:- स्मृती पर्व च्या 5 डिसेंबर रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या वतीने 2021 जनगणनेमध्ये आदिवासींच्या अस्तित्वाची भूमिका या विषयावर प्रल्हाद सिडाम यांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी आदिवासी जनगणनेचा इतिहास मांडताना 1871साली ब्रिटिशांनी पहिल्यांदा भारतामध्ये जनगणना सुरू केली. 1891पर्यंत ॲबओरिजनल किंवा आदिम धर्म असा उल्लेख केला. परंतु 1901ते 1921त्याच्यामध्ये बदल करून आदिवासींच्या समोर प्राकृतिक धर्म या पद्धतीचा उल्लेख केला. 1931साली अनुसूचित जनजाति या पद्धतीचा उल्लेख केले.1941आदिवासी असा उल्लेख केला. 1951साली अनुसूचित जमाती असा उल्लेख केला. 1961ते 2011पर्यंत आदिवासींच्या धर्म संदर्भात कुठल्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. परंतु 2011साली संपूर्ण भारतातील आदिवासींनी सातव्या कॉलममध्ये आपल्या धर्माचा उल्लेख इतर असा केला.
त्यामध्ये एकूण 83 जमाती संपूर्ण भारतात निर्माण झाल्या असून आपापल्या परीने 83 प्रकारचे धर्म त्या कॉलममध्ये देण्यात आले. संपूर्ण भारतातील जागृतीची प्रक्रिया निर्माण करणाऱ्या आदिवासी बांधवांनी सातत्याने बैठकी घेतल्या राष्ट्रपती पासून पंतप्रधाना पर्यंत आमच्या विविध सामाजिक संघटना चालवणार्या लोकांनी एकत्रित येऊन अंदमान-निकोबार येथे 24 ऑगस्ट 2019 ला संपूर्ण भारतातील आदिवासी समूहातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन एक निर्णय घेतला हिंदी आणि मराठी मध्ये धर्माच्या कॉलम मध्ये आदिवासी लिहायचं आणि इंग्रजीमध्ये ट्राईब शब्द लिहायचा याची नोंद सर्व भारतातील अनुसूचित जाती एसटी प्रवर्गातील बांधवांनी घ्यायची आहे. अशा पद्धतीचे विवेचन प्रल्हाद सिडाम अध्यक्ष कोयापुणेम गोटुल समिती यवतमाळ यांनी विचारमंथनामध्ये केले. बीज भाषण एम के कोडापे यांनी केले.त्यांनी जनगणनेवर आपल्या योजना अवलंबून आहेत. आदिवासीच्या प्रगतीचे महत्त्व हे जनगणनेत दडलेले आहे. त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या बारा टक्के असलेल्या या समूहाचे स्वतंत्र बजेटमध्ये तरतूद करायची असेल तर आपल्याला आदिवासी उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे.
रावणाला सर्वात प्रिय असा निळकंठ पक्षी होता गोंडी भाषेत त्याला रावेन म्हणतात रावण हे आपल्या पूर्वजांचे नाव आहे. ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे . प्रमुख अतिथी प्रा. वसंत कनाके याप्रसंगी बोलताना म्हणाले आपण जनगणनेच्या कॉलमध्ये हिंदू लिहायचे नाही आपले अस्तित्व जर टिकवायचे असेल तर आपल्याला आपली जीवनशैली आपली विचारशैली बदलली पाहिजे. आपला आदिवासी व आदिम धर्म आपण जपला पाहिजे. त्याचे विविध भाग प्रकार आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे असे मत मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जितेंद्र शिवाजीराव मोघे हे होते. याप्रसंगी बोलताना समाजामध्ये विषमतेचे बीज पेरले जात असून आपण सर्वांनी अतिशय जागृत पणे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना वाचवण्यासाठी आपला इतिहास लोकांसमोर मांडला पाहिजे. ऑलिंपिक गोल्ड मेडल मिळवणारे ध्यानचंद आपल्याला माहित आहे परंतु त्याच हॉकी टीमचा कॅप्टन जयपाल मुंडा हा आपल्या पर्यंत पोहोचवल्या जात नाही. या वरून आपल्या मेंदूला बिघडवणारी यंत्रणा कार्यरत आहे. आणि तोच मुद्दा खालपर्यंत पसरल्या जातो आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकत्रित यावं अशी भूमिका आदिवासी विकास परिषदेचेत बोलताना मांडली. प्रमुख अतिथी म्हणून एमके कोडापे, डॉ. न्यानेश्वर गोरे, बंडू मसराम, मनीषा तीरणकर, गिरधर मांगुळकर हे उपस्थित होते. याप्रसंगी रिटायर झालेले कवडू चांदेकर, वसंतराव मडावी,लक्ष्मणराव कुळसंगे, जितेंद्र मोघे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पांडुरंग आत्राम, सुनंदा मडावी, नागेश पेंदोर, पुनाजी मसराम, प्रवीण जुमनाके, सौरभ मेहता यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे संचालन सोनल आनंद परचाके यांनी केले तर प्रस्तावन प्रफुल्ल गेडाम तर आभार प्रदर्शन जयश्री मडावी यांनी केली.