वणी यवतमाळ रोडवरील खताचे ठिगारे —- वणी मारेगाव विभाग कारवाई करण्यास नकार !
ग्राहक प्रहार संघटनेने पुनःश्च दाखल केली तक्रार !
रास्ता रोको आंदोलन होणार !
यवतमाळ:- वणी यवतमाळ रोड हा तीन भागात विभागला गेला असून मोहदा पर्यंत यवतमाळ विभाग ,मोहदा ते उमरी पांढरकवडा विभाग व उमरी ते वणी वणी मरेगाव विभाग !
जिल्हाधिकारी कार्यलया कडे ग्राहक प्रहारची तक्रार गेल्यावर तातडीने यवतमाळ सार्वजनिक विभागाने तातडीने कारवाई करून मोहदा पर्यंत तातडीने रस्त्यालगत असलेले सर्व शेण खताचे ठिगारे उचलण्यात आले परंतु पांढरकवडा व मारेगाव वणी विभागाने जिल्हाधिकारी ह्यांचे आदेशाला केराची टोपली दाखविली की काय असे वाटत असून ह्या राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा ग्राहक प्रहार संघटनेचा विचार असून लवकरच ग्राहक प्रहार संघटनेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहे.
वणी मारेगाव रोडवर गनिमी काव्या पद्धतीने लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन
संबंधित मस्तवाल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय रास्ता रोको आंदोलन थांबणार नाही असा इशारा
प्रशासनाला दिला असून निवेदनावर ग्राहक प्रहार चे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र राजेंद्र आत्राम व सचिव प्रसाद नावलेकर , उपाध्यक्ष यशवंत काळे , कार्यध्यक्ष दामोधर बाजोरीया ,सहसचिव भैय्यासाहेब ठमके ,सल्लागार हणमंतू रजनलवार, , सघटक बंडूभाऊ लवटे,नागपूर च्या अरुणा पुरोहीत ,पाटनबोरी चे जयवंत बावणे अजय दुंमनवार,युनूस जाटू मारेगावाचे सचिन मेश्राम ,वनी चे विनोद कुचेरीया ,आर्णीचे शेख सत्तार शेख रजाक,, यवतमाळ चे अमित बागडे,पांढरकवडा चे अभय निकोडे, प्रकाश पुरोहीत , गणेश खोंडे उमरखेड चे यग्नेश वाघ,पुसदचे विवेक मॅन्नरवार, झरी जामणीचे मनोज गेडाम आदी अनेक सदस्याचे साह्याचे निवेदन पाठविण्यात आले आहे