October 30, 2024

यवतमाळ- दिग्रस दरम्यान रेल्वेच्या 934 कोटीच्या कामाचा प्रारंभ  

 

प्रतिनिधी यवतमाळ:- वर्धा – यवतमाळ – नांदेड या नविन रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान यवतमाळ ते दिग्रस पर्यँन्त 934 कोटी रुपयांच्या कामाच्या निवीदा निघाल्या असून लवकरच हे काम रेल्वे विकास निगमच्या देखरेखीत प्रारंभ केले जाणार असल्याची माहिती खासदार भावनाताई गवळी यांनी दिली आहे.

 

वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. वर्धा ते यवतमाळ पर्यन्त मातीकाम जवळपास पुर्ण होत आले आहे. आता यवतमाळ ते दिग्रस पर्यन्त रेल्वे प्रकल्पातील मातीकामाला सुरुवात होणार आहे. या संदर्भातील 934 कोटी रुपयांची निवीदा काढण्यात आली आहे. यवतमाळ ते दिग्रस 79 किलोमिटर चे काम सुरु करण्यात येत आहे. 78 किमी ते  110 किमी असे 32 किलोमिटर चे काम पटेल इंजिनिअरींग ही कंपणी करणार आहे. त्यांना 486 कोटी रुपयांची निवीदा प्राप्त झाली आहे. यापुढे 110 किमी ते  157 किमी पर्यन्त 47 किलोमिटर चे काम श्री राज राजेश्वर कंन्स्ट्रक्शन कंपणी करणार असून त्यांना 448 कोटी रुपयांच्या निवीदा प्राप्त झाल्या आहे. जानेवारी महिण्यात हे काम सुरु होण्याची शक्यता आहे. या कामाची काही जागा वनविभागाच्या क्षेत्रात येत असल्याने त्या भागातील कामाची परवानगी सीसीएफ यांनी तातडीने देणे गरजेचे आहे. सदर कामाची परवानगी एक वर्षापासुन प्रलंबित आहे. कोविड मुळे टेंडर प्रक्रिया लांबणीवर पडली असतांना खासदार भावनाताई गवळी यांनी पाठपुरावा करुन ही प्रक्रिया पुर्ण करुन घेतली. आता दिग्रस समोरील कामांच्या निवीदा लवकर निघाव्या याकरीता प्रयत्न सुरु आहे. वर्धा ते यवतमाळ मार्गात अनेक ठिकाणी पुलांची निर्मीती करण्यात आली आहे. बोगदे तयार करण्याचे काम सुध्दा सुरु आहे. अशाच पध्दतीने दिग्रस च्या समोर पाच ठिकाणी बोगदे तयार करण्यात येणार आहे. यामधील एक बोगदा जवळपास अडीच किलोमिटर लांबीचा आहे. त्यामुळे दिग्रस समोरील कामाचे सुध्दा टेंडर येत्या चार महिण्यात काढण्याची ग्वाही खासदार भावनाताई गवळी यांनी दिली. रेल्वे विकास निगम मध्ये अधिका-यांची कमतरता असल्यामुळे कामास विलंब होत आहे. त्यामुळे या विभागात पदभरती करण्यासाठी रेल्वे मंत्री तसेच रेल्वे बोर्डाकडे संपर्क साधून  भावनाताई गवळी यांचा पाठपुरावा सुरु आहे.  या रेल्वे प्रकल्पाचा खर्च केन्द्र सरकार 60 टक्के तर राज्य सरकार 40 टक्के करीत आहे. केन्द्र सरकार तसेच राज्य सरकारचा निधी लवकर रीलीज व्हावा यासाठी खासदार भावनाताई गवळी यांचे प्रयत्न सातत्याने सुरु आहे. या नविन रेल्वे मार्गावर 160 किलोमिटर प्रति तास या वेगाने रेल्वे धाऊ शकेल अशा पध्दतीच्या नविन स्लीपर लावण्यात येणार आहे. हे काम सुध्दा लवकरच प्रारंभ होणार आहे.

 

रेल्वे स्टेशनची इमारत

 

कोवीड मुळे रखडलेले रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम आता सुरु होत आहे. खासदार भावनाताई गवळी यांनी या जागेचे भूमिपुजन केले होते. आज कंन्स्ट्रक्शन कंपणीच्या अधिका-यांनी रेल्वेच्या अधिका-यांसोबत जाऊन स्थळाची पाहणी केली. डिसेंबर महिण्यातच या कामाची सुरुवात होणार आहे.

 

प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न

 

यवतमाळकरांचे स्वप्ण असलेला वर्धा यवतमाळ नांदेड हा रेल्वे प्रकल्प लवकर पुर्ण व्हावा यासाठी मी प्रयत्न करीत आहे. केन्द्र तसेच राज्य सरकारचा निधी लवकर प्राप्त व्हावा तसेच या प्रकल्पाला गती यावी यासाठी आपण वरीष्ठ नेते तसेच अधिका-यांच्या भेटी घेतल्या आहे. काही अडचणी असल्या तरी त्या दुर करुन या प्रकल्पाला गती देण्यात येईल. यामध्ये नागरीकांचे सहकार्य सुध्दा महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed