अफवेवर विश्वास न ठेवता किसान आंदोलनात सहभागी व्हा —- महेश पवार
८ डिसेंबर भारत बंद मधे सहभागी व्हा
देशात किसान आंदोलनाने पूर्ण जोर धरलेला असतांना भारत बंदची घोषणा झाल्यावर समाजमाध्यमे , व इतर माध्यमातून त्यांच्यावर वारंवार अफवा पसरवून आंदोलनाचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जात असतांना महाराष्ट्रातील स्वामिनी दारूबंदी आंदोलनाचे प्रमुख नेते महेश पवार यांनी अशा अफवांचे खंडन केले असून शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद द्यावा असे आव्हान केले आहे . महेश पवार सध्या दिल्लीत असून स्वामिनी आंदोलनाला किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकरणीत काम करीत आहेत .
शाहीन बाग वाली दादी , पाकिस्तानी झंडे , देश तोडणे के नारे , 370 हटाव के नारे , NRC का विरोध , देशद्रोही नारे आणि घटना या आंदोलनात होत आहेत त्यामुळे हे किसान आंदोलन नसून देशविरोधी गतीविधी आहे असे स्पष्ट करणारे काही आंदोलन , व्हिडीओ , फोटो सोशल मीडियावर वारंवार येत असून त्यामुळे भारत बंद अथवा आंदोलनाच्या चारित्र्यावर पडतोय मात्र असे काहीही होत नसून दिल्ली व दिल्ली बाहेरून येणार कप्रत्येक शेतकरी अशा कोणत्याही हेतूने येत नसून आंदोलनात मोदी सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावे हीच प्रमुख मागणी घेवून हे आंदोलन होत आहे. तसेच हे आंदोलन राजकीय नेते अथवा अड़ते असे कोणीही चालवत नसून शेकर्यांनी स्वतःच्या भरोषयावर उभे केले आहे. भारतातल्या सर्व शेतकरी संघटना यात सहभागी आहे.
या आंदोलनात बाबत सरकार आणि शेतकाऱ्यांची चर्चा सुरु आहे मात्र अद्यपहि एक मत झालेले नाही. त्यामुळे ६ तारखेच्या केंद्रीय बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीति आखन्यायत आली.
सरकार सर्वतोपरिने आंदोलन थांबविन्याचा प्रयत्न करीत आहे मात्र हे आंदोलन पुढील सहा महीने चालले तरी शेतकऱ्यांची तयारी आहे. असे महेश पवार म्हणालेत. तसेच आम्ही या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवत नसून आपण देखील जो पर्यत किसान आंदोलनातून आपल्याला सूचना येत नाहीत तो पर्यत कोणत्याही गोष्टीवर विश्वस न ठेवता आंदोलनात सक्रिय रहावे असे देखील महेश पवार म्हणाले आहेत .