वन्यप्राण्यांकडून शेतातील उभ्या पिकाचे नुकसान, वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गुरुदेव संघाची मागणी
प्रतिनिधी यवतमाळ:- यवतमाळ तालुक्यातील आमसेत उमरठा वसाहत येथील शेतकऱ्यांच्या शेतातील अतोनात नुकसान झाले आहे शेतातील उभे पीक उध्वस्त झाले असून या पिकाची पाहणी मनोज गेडाम यांनी केली आहे महसूल व वनविभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे
वन्यप्राण्यांकडून शेतातील उभे पीक उद्ध्वस्त केल्या जात आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून भाजीपाला व अन्य पिकांचे नुकसान जंगलातील प्राणी करीतच आहे.
वनविभाग काय शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे का असा प्रश्न मनोज गेडाम यांनी केला आहे, जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजाची ओळख आहे, अशातच शेतकरी कधी सुखावणार असा प्रश्न बळीराजा समोर उभा ठाकला आहे, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे, मात्र दुर्दैवाने सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून सर्वत्र यवतमाळ जिल्ह्याची नवीन ओळख होऊ लागली आहे,
शेतकरी नेते राजकारण करून आपली पोळी शिजवत असल्याचा आरोप देखील यावेळी गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, शेतकऱ्याच्या संकटाची विविध मालिका सुरूच आहे
यवतमाळ जिल्ह्यात वनमंत्री असून वनविभागाचे अधिकारी शेतकर्यांच्या समस्यांकडे का चालढकल करीत आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे असे मत मनोज गेडाम यांनी या वेळी व्यक्त केले, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई महसूल व वन विभागाने त्वरित द्यावी अन्यथा गुरुदेव युवा संघाच्या वतीने यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी सांगितले आहे