डॉ बाबासाहेब आंबेडकर हयाचे संविधानामुळे आज मानवाधिकार प्राप्त !
मारेगाव प्रतिनिधी:- मारेगाव येथे ग्राहक प्रहार संघटनेने आंतराष्ट्रीय मानवाधिकार दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे पुतळ्याला अमोल चौधरी व इम्रान शेख ह्यांचे हस्ते मल्यार्पर्ण करून साजरा करण्यात आला .ह्या प्रसंगी
प्रमुख उपस्थितीत ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर प्रामुख्याने उपस्थित होते .
मल्यार्पर्ण केल्यावर अमोल चौधरी म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जे संविधान बनविले त्यामुळे आज मानवाला समान अधिकार प्राप्त झाले .त्यामुळे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे स्मरण होणे महत्त्वाचे आहे संघटनेने छोटे खाणी कार्यक्रम आयोजित केला ते सर्व अभिनंदनास पात्र आहे !असे म्हणाले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मेश्राम तालुका अध्यक्ष ग्राहक प्रहार संघटना ह्यांनी केले संचलन पंकज नेहारे ह्यांनी केले आभार आनंद नक्षणे हयानी मानले कार्यक्रमास समीर कुडमेथे,मारोती परचाके, रॉयल सैय्यद, हरीश झाडे,शारुख शेख,संजय शेंडे,प्रशांत दुधकोवले,राहुल सीडाम, मयूर मसराम,मिथुन अवताडे,राहुल
रस्ते,दुशांत जैस्वाल,जितम तेलतुंमडे,रवी मोगरे सह अनेक जण हजर होते